मोहिते पाटील गटाला पुन्हा येणार सुगीचे दिवस; मंत्रीपदासाठी रणजितसिंहांचे नाव चर्चेत

सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढत त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाकडून होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Ranjitsinha Mohite Patil
Ranjitsinha Mohite PatilSarkarnama

सोलापूर : मोहिते पाटील (Mohite Patil) गटाला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. कारण, नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinha Mohite Patil) यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. मोहिते पाटील यांना मंत्रीपद तसेच पालकमंत्रीपद देऊन सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढत त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाकडून होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (Ranjit Singh Mohite Patil's name is being discussed for the post of Minister)

सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, जिल्हा दूध संघ (दूध पंढरी) व इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांना ताकद देऊन सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचे असलेले वर्चस्व मोडीत काढण्याचा भाजपश्रेष्ठींचा मनसुबा आहे, त्यातून रणजितसिंहांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Ranjitsinha Mohite Patil
मोठी बातमी : शिवसेनेला मोठा धक्का; ‘मातोश्री’वरील बैठकीला १० खासदारांची दांडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होण्याचे संकेत या दोघांनीही दिल्ली दौऱ्यादरम्यान दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांची नावे आणि त्यांनी लावलेली फिल्डिंग पुढे येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले पाच आमदार आहेत, तर एक भाजप समर्थक अपक्ष आमदार आहेत. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन दिग्गजांमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच आहे, त्यामुळे या दोघांमध्ये आपसूकच स्पर्धा सुरू आहे. या दोघांपैकी कोणाचा नंबर लागतो हे पाहावे लागेल. भाजप पक्षश्रेष्ठीची धक्का देण्याची पद्धत लक्षात जुन्यांना बाजूला ठेवून नव्या लोकांना संधी दिली जाऊ शकते, त्याचा अनुभव नुकताच राज्याने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणे अपेक्षित असताना एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी बसविले आहे, तर फडणवीसांना उमुख्यमंत्री केले आहे, त्यामुळे जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याची समर्थकांना उत्सुकता आहे.

Ranjitsinha Mohite Patil
बंडखोर आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात; तिसरा बंडखोर अपघाताला सामोरे

दुसरीकडे, मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात आजही टिकून आहे. विशेषतः माढा लोकसभा आणि माळशिरस, करमाळा विधानसभा मतदारसंघात या गटाची ताकद मोठी आहे. त्याचे दर्शन माढा लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाले आहे. या दोन्ही ठिकाणी मोहिते पाटील यांनी लावलेल्या ताकदीमुळेच भाजपचा विजय झाला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेची सत्ताही अनेक वर्षे मोहिते पाटील गटाच्याच ताब्यात होती. विजयसिंह मोहिते पाटील म्हणतील ती पूर्व दिशा असायची. पण, लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या मदतीने अपक्ष सदस्य संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकाविले. तो मोहिते-पाटील गटासाठी मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नगरपालिका, नगरपंचायतीत भाजपची सत्ता आणण्यासाठी मेहनत घेतली. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या ताकदीवर भाजपला मोठे यश मिळू शकते, असे पक्षश्रेष्ठीला वाटत असावे, त्यातूनच मंत्रीपदासाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com