Sangram Kote Vs Nilesh Rane: 'राणेंनी जो बाइडन सोडून सर्वांवरच टीका केली आहे'

भाजपचे ( BJP ) माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यावर टीका केली होती.
Sangram Kote Vs Nilesh Rane

Sangram Kote Vs Nilesh Rane

Sarkarnama

अहमदनगर : राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीतील नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे ( BJP ) माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यावर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते संग्राम कोते यांनी सोशल मीडियावरून निलेश राणेंच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे. 'Rane has criticized everyone except Biden'

संग्राम कोते म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. राणे यांनी आतापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन सोडून सर्वांवरच टीका केली आहे. भाजप नेतृत्वाला खुश करण्यासाठी टीकेचे रोज नवीन नवीन मापदंड राणे पूत्र रचत आहेत. अजित पवार हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. 1990 पासून आजपर्यंत सर्वच निवडणुका जिंकत राज्यात विविध जबाबदाऱ्या अत्यंत कार्यक्षमपणे मागील 34 वर्षांतील त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत त्यांनी सांभाळल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Sangram Kote Vs Nilesh Rane</p></div>
निलेश राणे म्हणाले, भास्कर जाधव खोटारडे..त्यांनी आईबहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या!

त्यांनी पुढे म्हटले आहे की, टीका करताना वयाचही भान ठेवले जात नाही अस कोणत कर्तृत्व निलेश राणे यांनी दाखवले आहे. राज्याच्या राजकीय सामाजिक परंपरेच अधःपतन कोणाला खुश करण्याच्या नादात होऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना कोणते शब्द वापरावे याचे ही भान ठेवणे महत्वाचे वाटते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत ही झालेल्या प्रकाराबाबत मी निषेध व्यक्त करतो असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com