Satara : भाजपच्या 'ईडी'ला रामराजेंचे 'शिडी'ने उत्तर... अशा बऱ्याच शिड्या माझ्याकडे....

आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांच्याकडे असलेले किसन वीर Kisan veer व खंडाळा कारखाने Khandala Sugar Factory देखील चांगले चालावेत. किसन वीर चालू झाला नाही तर पाच-सहा तालुक्यातील ऊसावर त्याचा परिणाम होतो.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

लोणंद : सगळे साखर कारखाने चांगले चालावे ही माझी भावना आहे. आमच्या तालुक्यातील एक कारखाना कधी चालु होतो व कधी बंद होतो हे कोणालाच कळत नाही. तो चालवणाराच बिघडलेला असेल तर करणार काय, असा प्रश्न करून सध्या सत्तेत मोठी माणसे आहेत. माझ्या मागे 'ईडी' लावतील. लावली तर लावू द्यात, त्यांच्याकडे 'ईडी' आहे तर, माझ्याकडे शिडी आहे. अशा बऱ्याच शिड्या माझ्याकडे आहेत, अशी टीका विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निबांळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक -निबांळकर यांचा नामोल्लेख टाळून केली.

रामराजे नाईक निबांळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्याबद्दल लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील अहिल्यादेवी स्मारकात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Satara : मोदींच्या अजेंड्यावरुनच गोरेंकडून टीका : रामराजे

यावेळी सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सुचेता हाडंबर, नगराध्यक्षा मधुमती पलंगे-गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, जेष्ठ नेते एन. डी क्षीरसागर,अॅड.सुभाषराव घाडगे, विनोद क्षीरसागर, नगरसेवक भरत शेळके, सचिन शेळके, गणिभाई कच्छी,सागर शेळके,सहायक पोलिस निरिक्षक विशाल वायकर, संभाजी घाडगे, बाळासो शेळके, सुनिल शेळके, प्रविण खताळ, अॅड गजेंद्र मुसळे, अमोल यादव, शाहुराज काटकर आदी उपस्थित होते.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

रामराजे म्हणाले, सर्वांनी सुखी असावे असे मला वाटते, शेतकऱ्याचे चांगले व्हावे. उपाळ्यासह सर्व कारखाने चांगले चालावेत. कारखाने चालवे ही माझी भावना आहे. मात्र, चालवणाराच बिघडलेला असेल तर त्याला काय करणार. आमदार मकरंद पाटील यांच्याकडे असलेले किसन वीर व खंडाळा कारखाने देखील चांगले चालावेत. किसन वीर चालू झाला नाही तर पाच-सहा तालुक्यातील ऊसावर त्याचा परिणाम होतो. तेथील शेतकऱ्यांच्या हाती ऊसाशिवाय काहीच राहिलेले नाही, असेही रामराजेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com