Phaltan : रामराजेंचे खासदार निंबाळकरांना आव्हान, हिंमत असेल तर अपक्ष लढा...

Ramraje Nimbalkar फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

Phaltan City News : फलटण, खंडाळा व माळशिरसला नीरा-देवघर प्रकल्पातील हक्काचे पाणी हे मिळायलाच हवे, यामधून जे पाणी उरेल ते पाणी सांगोला व पंढरपूरला देण्यास आमचा विरोध नाही. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar हे जलनायक नसुन खलनायक आहेत. त्यांनी स्वतः कुठला पाणी प्रश्न सोडविला हे एकदा जनतेला सांगावे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मी अथवा संजीवराजे यांच्याविरुध्द अपक्ष लढावे. तेव्हा जनताच त्यांना त्यांची पायरी दाखवेल, असे आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी दिले आहे.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती. सध्या तालुक्यात पाणी पळविल्याच्या, विरोध केल्याच्या, पाणी आणलेल्याच्या विविध डरकाळ्या व आवई उठत आहेत, परंतु फलटणकरांनी विचलीत होऊ नये, जोवर मी आहे तोवर आपल्या हक्काच पाणी कुठेही जाऊ देणार नाही, असे स्पष्ट करुन रामराजे म्हणाले, मी ज्यावेळी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळी कृष्णा खोऱ्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले होते की, जर ३१ मे २००२ पुर्वी हे पाणी अडवावे लागेल, वापरावे लागेल.

त्या दिवसापासुन आजतागायत हा अखंड खटाटोप किंबहूना माझ्या राजकीय कारकिर्दीचा मुख्य केंद्रबिंदू कृष्णा पाणी लवाद, त्या लवादातून होणारे त्रास, लवादाचे दुष्परिणाम झाले तर कुठल्या जिल्ह्याचा पाणी पश्चिम महाराष्ट्रातून जाईल यातच माझी तीस वर्षे गेली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले त्या दिवसापासुन त्यांच्यासह त्यांचे मित्र आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्यावर पाणीप्रश्नी टिकाटिप्पणी चालू केली होती.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : राजकारणात काम करण्यासाठी वेगळं शिक्षण लागत का...निंबाळकर

त्यानंतर नीरा डाव्यात गेलेल पाणी नीरा उजवा कालव्यात न टाकता नीरा-देवघरचे पाणी लाभक्षेत्राच्या बाहेरील उपसा सिंचन योजनेत टाकावे, असा विचित्र शासन निर्णय झाला. परंतु सत्ताबदलानंतर पुन्हा पुर्वीसारखीच पाणीवाटपाची परिस्थिती राहिली. यामध्ये फलटण तालुक्यापुरत बोलायच झाल तर या तालुक्यात पुर्वी दोन साखर कारखाने होते. आता चार झाले आहेत, ऊसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सत्तेसाठी मी पाणी वळविले असे आरोप माझ्यावर केले जातात ते खोटे ठरतात, असेही रामराजे यांनी सांगितले.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : सर्व विकास कामांचे श्रेय रामराजेंना; मला श्रेयवादात पडायचे नाही : निंबाळकर

जर धोम बलकवडी धरण केलं नसतं तर पाणी आपण तालुक्यात आणलं नसत तर खासदारांचा स्वराज व दुसरा कारखाना तालुक्यात झाला असता का असा सवाल करुन रामराजे म्हणाले, त्यांनी त्यांचा कारखाना कुठल्या पाण्यावर काढलाय हे एकदा नीट तपासावे. राजकीय आरोप करुन शरद पवार यांनी पाणी पळविले एवढच ते बोलत राहिले. कृष्णा महामंडळाच्या माध्यमातून केवळ नीरा-देवघरच नव्हे तर अन्य पाच जिल्ह्यांच ८१ टीएमसी पाणी वाचविण्यात मला यश मिळाले, हे माझे कष्ट महाराष्ट्र राज्य कधीही विसरणार नाही याची आपणास खात्री आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जाणार; मोदींकडून हिरवा कंदील...

जर खासदारांना पाणी प्रश्नावर राजकारण करायच असेल तर तुम्ही पाणी प्रश्नावर काय केल हे जनतेला सांगावे. यासाठी मंजुरीसाठी लागणारे कष्ट, प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनासाठीचे कष्ट आमचे, स्थलांतरीत जमिनी सोडायला लावण्याचे कष्ट आमचे, असे आसताना खासदार म्हणे जलनायक झालेत. हे जलनायक नसुन खलनायक झालेले आहेत. म्हैसाळच पाणी, कृष्णेच पाण्याच पुजन कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री म्हणूनच केले होते.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : सत्तांतराची स्वप्ने बघू नका; इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच : रामराजे

पाणी वाटपाचा फेरविचार झाला असता तर टेंभू व म्हैसाळ बंद पडले असते. त्यामुळे सांगोल्याला पाणी देण्यात माझा मोठा सहभाग असल्याचे व यामागे शरद पवार यांची ताकत होती. म्हणून हे शक्य झाले, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. नीरा-देवघरच बचतीच तीन टीएमसी पाणी खंडाळा, फलटण व माळशिरस यांना योग्य प्रमाणात देऊन उरलेल पाणी सांगोल्याला देण्यास आमची ना नाही.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsingh Vs Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार : खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गौप्यस्फोट

तसेच महाबळेश्वर येथील सोळशी गावातील प्रकल्पाचा शोधही माझाच असल्याचेही रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. सांगोल्यात माझे पुतळे जाळण्यात आल्याचे कानावर आले आहे. आमदार शहाजीबापू पाटील हे मित्रच आहेत. परंतू चुकीच्या माहितीच्या अधारे अशी कृत्ये होत असतील तर त्यांचेही पुतळे इकडे जाळले गेले तर आपणास मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara : शाळा शिकू का शेत राखू... परळी खोऱ्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com