मंत्रीपद वाचविण्यासाठी रामराजेंनी नीरा देवघर प्रकल्प रखडवला... रणजितसिंह निंबाळकर

नरेंद्र मोदींच्या Narendra Modi आदेशानुसार नीरा देवघर प्रकल्पासाठी Nira Devghar project एक गोपनीय समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये सत्ताधारी मंडळींनी दिलेल्या चुकीच्या अहवालाची पोलखोल झाली आहे.
Ranjitsinh Nimbalkar, Ramraje Nimbalkar
Ranjitsinh Nimbalkar, Ramraje Nimbalkarsarkarnama

सातारा : माजी खासदार कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला नीरा देवघर प्रकल्पास राज्य व केंद्र सरकरच्या रखडलेल्या मान्यतांना नुकतीच मंजूरी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतःचे मंत्रीपद अबाधित राहण्यासाठी हा प्रकल्प रखडवला, अशी टीका माढाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

फलटणला बांधकाम विभागाच्या शासकिय विश्रामगृहात खासदार निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, शरद पवार व अजित पवार यांनी फलटण, माळशिरस या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे हक्काचे पिण्याचे पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीसाठी वळवले.

Ranjitsinh Nimbalkar, Ramraje Nimbalkar
रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

त्यावेळी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सत्तेत घेत मंत्रीपद दिले व शांत केले. त्यावेळी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद होते. त्यांनी ठरविले असते तर नीरा देवघर प्रकल्प केव्हाच पूर्णत्वाला गेला असता. मात्र, त्यांनी मंत्रीपदासाठी फलटणकरांच्या हक्काचे पाणी बारामतीला दिले. त्यावेळच्या अधिकाऱ्यांवर शरद पवार व अजित पवार यांनी दबाव टाकून खोटे अहवाल केंद्राला सादर केले. त्यामुळे हा प्रकल्प रखडला.

Ranjitsinh Nimbalkar, Ramraje Nimbalkar
रणजितसिंह निंबाळकरांनी दिले थेट रामराजेंनाच आव्हान; हिंमत असेल तर...

खोटे अहवाल करणात ज्या अधिकारी, आमदार व मंत्र्यांचा समावेश होता, त्याची एसआयटी मार्फत चौकशीसाठी आपण मागणी करणार आहे. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून खोटे अहवाल सादर केल्यामुळे फलटण, माळशिरस यासह नीरा देवघरच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावे पाण्यापासून वंचित राहिली.

Ranjitsinh Nimbalkar, Ramraje Nimbalkar
Video: 'धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नव्या जोमाने वाढवणार - ओमराजे निंबाळकर

रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेशी गद्दारी करत दुष्काळी भागातील पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीला वळवले, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयामार्फत नीरा देवघर प्रकल्पासाठी एक गोपनीय समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये सत्ताधारी मंडळींनी दिलेल्या चुकीच्या अहवालाची पोलखोल झाली. त्यामुळे या प्रकल्पांची मान्यता प्रलंबित होती, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com