शिवेंद्रराजेंचा पत्ता रात्रीत असा कापला तरीही रामराजेंनी त्यांचे आभार मानले..

रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले
Ramraje-Shivendra Raje
Ramraje-Shivendra RajeSarkarnama

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम आज पार पडला. यात अध्यक्षपदी नितीन लक्ष्मणराव पाटील (Nitin patil) तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई (Anil Desai) यांची निवड करण्यात आली. विषेश म्हणजे या निवडी सर्वानुमते बिनविरोध पार पडल्याने जिल्ह्यातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पण दुसऱ्या बाजुला साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचा मात्र हिरमोड झाला. कारण कालपर्यंत अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते, पण आज सकाळी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर बोलताना विधानपरिषदेचे सभापती आणि जिल्ह्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवूनच हे सर्व घडवून आणले, असेही रामराजेंनी स्पष्ट केले. मात्र या आभार प्रदर्शनामुळे शिवेंद्रराजेंचा पत्ता कट झाला पण तरीही रामराजेंनी त्यांचे आभार मानले, अशी चर्चा साताऱ्याच्या राजकारणात आज सकाळपासून सुरु आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती, यात शिवेंद्रसिंहराजे, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे, सत्यजित पाटणकर यांची नाव चर्चेच होती. यातही शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्याला दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी रामराजेंपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत भेटीगाठी घेतल्या होत्या. दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून निवडून आलेले संचालक नितीन पाटील यांनीही आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि रामराजेंना सांगितले होते.

Ramraje-Shivendra Raje
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

रात्रीत सुत्रे हालली :

कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या संचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. यासाठी काहींनी थेट शरद पवार आणि अजित पवारांपर्यंतही मागणी पोचवली होती. त्यामुळे दोन्ही पवार काका-पुतणे बारामतीमधून कोणाचे नाव फायनल करतात याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या होत्या.

अखेरीस रात्रीत सुत्रे हालली. रात्री बारा वाजता शरद पवार यांचा रामराजेंना फोन आला व रामराजेंनी आगामी काळात पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादीचाच संचालक बँकेवर गरजेचा आहे, असा मुद्दा मांडला. त्यानुसार नितीन पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. कारण कितीही झाले तरी शिवेंद्रराजे अध्यक्ष झाले असते तर बँक भाजपच्या ताब्यात गेली असती आणि ते राष्ट्रवादीला परवडणारे नव्हते. तर शिवेंद्रसिंहराजेंचा मान राखण्यासाठी त्यांच्या कोट्यातून अनिल देसाई यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी निवडी नेहमीप्रमाणे बिनविरोध झाल्या.

Ramraje-Shivendra Raje
सातारा जिल्ह्यात २०५ नगरसेवक होणार, नवीन शासन निर्णयामुळे इच्छुकांना लॉटरी

या निवडीनंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेच्या प्रथेप्रमाणे निवडणूक पार पाडली आहे. पदाधिकारी निवडीही बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे पॅनेलचे सर्व विषय आता संपले आहेत. सातारा जिल्हा बँक देशात एक नंबरची बँक झालेली आहे. अजून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बँक कशी नेता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहिल. शिवेंद्रसिंहराजेंचे मी आभार मानतो. कारण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हे सर्व घडवून आणले. त्यामुळे बँक निश्चितपणे चांगल्या प्रकारे चालेल, याची ग्वाही मी साताऱ्यातील जनतेला देतो, असे रामराजेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com