कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

रामराजे म्हणाले, सातारा जिल्हा बॅंक महाराष्ट्रातील एक नंबरची बँक आहे. तुमच्यातील एकाने अन्‌ आमच्यातील एकाने या बँकेची तक्रार 'ईडी'त जावून केली.
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

दहिवडी : कोणी कितीही गर्जना करु द्यात, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार आहे. या चांगल्या चाललेल्या बँकेला अडचणीत आणण्याचं काम काहीजण करत आहेत. पीक कर्ज देणाऱ्या बँकेला पीककर्ज देण्यापासून काहीजण रोखत आहेत. अशा लोकांना बँकेत येऊ देऊ नका. आमदारकी येईल तेव्हा आपण बघू. बोलणारा मी एकटाच आहे, असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार गोरे यांचा नामोल्लेख टाळून केला.

दहिवडी (ता. माण) येथे श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, अनिल देसाई, राजेंद्र हजारे, डॉ. सुरेश जाधव, मनोज पोळ, सहायक निबंधक विनय शिंदे, संस्थेचे अध्यक्ष सुनिल पोळ, बाबासाहेब माने, बाळासाहेब सावंत, युवराज सुर्यवंशी, बाळासाहेब काळे, उपाध्यक्ष सुरेश इंगळे, निलिमा पोळ, किसन सावंत, तानाजी मगर, श्रीकांत जगदाळे, प्रशांत विरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ramraje Naik Nimbalkar
अजित पवार म्हणाले, आता माझ्याच ज्ञानात नवीन भर पडायला लागली..

रामराजे म्हणाले, सातारा जिल्हा बॅंक महाराष्ट्रातील एक नंबरची बँक आहे. तुमच्यातील एकाने अन्‌ आमच्यातील एकाने या बँकेची तक्रार 'ईडी'त जावून केली. त्यामुळे इथं चांगला संचालक निवडून द्या. कोणी कितीही गर्जना करु द्यात. जिल्हा बँकेत आपलंच पॅनेल येणार आहे. या चांगल्या चाललेल्या बँकेला अडचणीत आणण्याचं काम काहीजण करत आहेत. पीक कर्ज देणाऱ्या बँकेला पीक कर्ज देण्यापासून काहीजण रोखत आहेत. अशा लोकांना बँकेत येवू देवू नका. आमदारकी येईल तेव्हा आपण बघू. बोलणारा मी एकटाच आहे. तुमच्या तालुक्यातील कोण बोलत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.