ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही भेट महत्वपूर्ण मानली जात असून राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये उदयनराजेंचा समावेश होणार याची प्राथमिक चर्चा मानली जात आहे.
Udayanraje Bhosale, Ramraje Nimbalkar
Udayanraje Bhosale, Ramraje Nimbalkarsarkarnama

सातारा : ज्या विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात भांडणे झाली होती. आज त्याच विश्रामगृहात हे दोन राजे एकत्र आले व त्यांनी तासभर बंद खोलीत चर्चा ही केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलमध्ये उदयनराजेंना सहभागी करून घेण्याबाबत राष्ट्रवादीतून विरोध होत असताना या दोन राजांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या विषयी सभापती रामराजेंनी मात्र, ही कौटुंबिक भेट होती. आमचे नऊ पिढ्यांचे संबंध आहेत, त्यामुळे आम्ही भेटलो यात काहीही विशेष नाही, असे स्पष्ट केले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील कलगीतूऱ्याचे किस्से संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत. पण काही महत्वाच्या विषयावर हे दोन्ही राजे एकमेकांची भेट घेऊन चर्चाही करतात. त्यावेळी मात्र, आपसातील मतभेद विसरून दोघे एकत्र बसून चर्चा करतात. आज मात्र, खासदार उदयनराजे भोसले दूपारपासूनच सातारा शासकिय विश्रामगृहात होते. दुपारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विश्रामगृहात आले व ते उदयनराजे बसलेल्या कक्षात गेले. दोघांत सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. या दोन राजांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्य गेल्या.

Udayanraje Bhosale, Ramraje Nimbalkar
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

एकीकडे भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करून ईडीची कारवाई करत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा व फलटणच्या राजांतील ही भेट सर्वांनाच धक्का देणारी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने ही भेट महत्वपूर्ण मानली जात असून राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये उदयनराजेंचा समावेश होणार याची प्राथमिक चर्चा मानली जात आहे.

Udayanraje Bhosale, Ramraje Nimbalkar
अजित पवार यांच्यावर छापे : राजकीय `क्रोनोलाॅजी` समजून घ्या...

या भेटी विषयी सभापती रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, आमची विविध विषयांवर चर्चा झाली. सातारकरांनी काहीही समजायचे नाही. त्यांचे आणि आमचे गेल्या नऊ पिढ्यांचे संबंध आहेत. या ही पिढीत आम्ही एकमेकांशी बोललो तर समजायचा काय विषय येतो. यामध्ये दुसरे काहीही नाही. जिल्हा बँकेच्या विषयी काही चर्चा झाली का, त्यावर त्यांनी अजून निवडणूकच लागलेली नाही, असे सांगितले. मी सभापती असल्याने मी राजकारणावर काहीही बोलू शकत नाही. आमचे पिढ्यानपिढ्याचे संबंध आहेत ते जपायचे प्रयत्न करू, असे सांगत त्यांनी अधिक बोलने टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com