Ramesh Kadam News : रमेश कदम यांना आठ वर्षांनंतर जामीन मंजूर; पण मुक्काम जेलमध्ये राहणार...

कदम यांच्यावर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल झालेले आहेत.
Ramesh Kadam
Ramesh Kadam Sarkarbana

मुंबई : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. अण्णासाहेब साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी कदम यांना आठ वर्षांनंतर एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. जमीन देताना कदम यांनी मुंबई आणि ठाण्याबाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. (Ramesh Kadam granted bail after eight years; But the stay will be in jail...)

दुसरीकडे, कदम यांच्यावर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे साठे प्रकरणात त्यांना जामीन मिळाला असला तरी अन्य प्रकरणांमध्ये अटक कायम आहे. त्यामुळे कदम यांची लगेच कारागृहात सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ramesh Kadam
Old Pension Scheme : सोलापुरातील माजी आमदार आडमांनी दिला जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्यासाठी एक लाखाचा निधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे रमेश कदम हे अध्यक्ष हेाते. त्या कालावधीत त्यांनी अनेक बनावट लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा गैरव्यहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळील गैरव्यवहाराचे ते मुख्य सूत्रधार आहेत. या गैरव्यवहारप्रकरणी कदम यांना आठ वर्षांपूर्वी अटक करण्यात होती.

Ramesh Kadam
Amruta Fadnavis News: अमृता फडणवीसांना एक कोटीची ऑफर देणारी डिझायनर पोलिसांच्या ताब्यात

गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्यानंतर रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. या गैरव्यवहाराबाबत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कदम यांच्यावर थेट आरोप केला होता. अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले आहेत, असा दावाही ढोबळेंनी केला हेाता.

Ramesh Kadam
Supreme Court Hearing : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी चालली तब्बल १२ दिवस ४८ दिवस : या तारखेपर्यंत निकाल शक्य

महामंडळाचे अध्यक्ष असताना रमेश कदम यांनी ७३ जणांची भरती कोणतीही प्रक्रिया न राबवता केली होती. नियुक्त कर्मचाऱ्यांना गृहकर्ज म्हणून २० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यातील सुमारे १५ लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले होते. अनेक प्रकरणांवर बनावट सह्या करण्यात आल्या होत्या. परस्पर लाभार्थींचे धनादेश वाटण्यात आले होते. तसेच बारामती तालुक्यातील खंडाळी येथील महालक्ष्मी दूध संस्थेला पाच कोटी दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. तसेच, रमेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातही ६ कोटी ५६ लाख रुपये वाटल्याचा आरोप होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com