Karad : रामदास कदमांच्या प्रतिमेला कराडात शिवसैनिकांनी मारले 'जोडे'....

रामदास कदम Ramdas Kadam यांना येणाऱ्या निवडणुकीत Election शिवसैनिक Shivsainik व जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
Karad Shivsena Agitation
Karad Shivsena AgitationSarkarnama

कऱ्हाड : ठाकरे कुटुंबीयांवर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना कऱ्हाड तालुक्याच्यावतीने निषेध करण्यात आला. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रामदास कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद-पाटील म्हणाले, 32 वर्षे आमदारकी, दहा वर्षे मंत्रीपद, चार वर्षे विरोधी पक्षनेतेपद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाले असतानाही उपकाराची जाणीव न ठेवता खाल्ल्या मिठाला न जागता चोराच्या उलट्या बोंबा रामदास कदम यांच्याकडुन सुरू आहेत.

Karad Shivsena Agitation
Satara : भाजपचे मिशन 'सातारा जिल्हा परिषद'; तालुकानिहाय बैठका, सभांचे आयोजन...

येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक व जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना कऱ्हाड तालुका, शहर व जिल्ह्याच्यावतीने आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत. महिला आघाडी जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी धिक्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

Karad Shivsena Agitation
Video: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड त्याच्यासाठी देवदूतासारखे धावून आले

यावेळी दक्षिण तालुका प्रमुख शशिकांत हापसे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, युवा सेना शहर संघटक अक्षय गवळी,दिलीप यादव, शहाजीराव जाधव, संजय चव्हाण, माणिक आथरकर, ऋषिकेश महाडिक, संदीप पाटील, कविता यादव, शोभा लोहार, प्रेमलता माने, प्रतिभा नाईक, विभाग प्रमुख महेश पाटील, प्रवीण लोहार अनिल चाळके महेश भावके, ओमकार काशीद पाटील, बापू भिसे ,कृष्णात बोडरे, विद्यानंद पाटील आदी उपस्थित होते.्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com