ग्रामस्थांनी अनुभवली आठवलेंची कार्यकर्त्याप्रती आपुलकी

Ramdas Athavle| बनुताई यांची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती बिकट असली तरी त्या मनाने पक्क्या होत्या,
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

सातारा (रेठरे बुद्रुक) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavle) आपल्या वक्त्वव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांना आपल्या कार्यकर्त्यांबद्दलही किती आपुलकी आहे, याचा अनुभव नुकताच एका प्रसंगातून समोर आला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या ज्येष्ठ नेत्या बनूताई येलवे यांच्या निधनानंतर आज दुपारी शेरे येथे शोकसभा घेतली. बनुताई यांची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती बिकट असली तरी त्या मनाने पक्क्या होत्या, अशा भावना व्यक्त करत त्यांनी येवले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचे आश्वासनही दिले. विशेष म्हणजे व्यासपीठावरून खाली उतरताच त्यांनी येवले कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना रोख आर्थिक मदत केली.

Ramdas Athawale
पेडणेकरांनी भाजपचा डाव उलटवला; फडणवीस अन् कोश्यारींचेही फोटो केले शेअर

येलवे यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने यासंबंधीच प्रस्ताव द्यावा. येवले कुटुंबियांकडे राहायला स्वत:चे पक्के घर नव्हते; पण मनाने त्या पक्क्या होत्या. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी माझ्या फंडातून निधी देईन. तसेच, चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दोन लाखांची मदत देऊ, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.

सभेतून खाली उतरल्यानंतर त्यांनी येवले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा मुलगा सचिन आणि पत्नी प्रियांका यांच्याकडे तत्काळ २५ हजार रुपये सुपूर्द केले. एक केंद्रीय मंत्री, पक्षाचा राष्ट्रीय नेता एका सामान्य कार्यकर्त्यासाठी किती आपुलकीने काळजी घेतो, याची प्रचिती तेथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in