रामदास आठवलेंनी पिचडांना हळूच कानात विचारले...

देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) आज राजूर ( Rajur ) येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Mathukarrao Pichad ) यांच्या निवासस्थानी आले होते.
रामदास आठवलेंनी पिचडांना हळूच कानात विचारले...
Ramdas Athavale asked PichadSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी आले होते. मधुकरराव पिचड यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पिचडांशी कानगोष्टी केल्या. या कानगोष्टी जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. Ramdas Athavale asked Pichad in his ear...

स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री आठवले व माजी मंत्री मधुकर पिचड हे नाष्टा करण्यासाठी आतील दालनात गेले असता कौटुंबिक चर्चा, सध्याचे राजकारण, देशाचे राजकारण यावर चर्चा झाल्या. त्यावेळी आठवले यांनी मधुकरराव पिचड यांच्या कानाजवळ जात भाजपकडून राज्यात काही पद मिळाले का असे विचारले.

Ramdas Athavale asked Pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

यावर पिचड म्हणाले, माझे आता वय झाले. पक्षाने वैभवला आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मंत्री पद दिले आहे. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझा सन्मान मात्र तालुक्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निश्चित आवाज उठवू आज आदिवासींच्या शेत जमिनी मालकी असताना इतर हक्कात टाकणार असतील तर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. या वयात आपण सामाजिक न्याय देण्यासाठी वेळ पडली तर न्यायालयात जाऊ आपणही मागासवर्गीय प्रश्नांसाठी बोलवा आपण तयार आहोत. आदिवासी आरक्षणाबाबत सत्तेत असतानाही माघार घेतली नाही, असे पिचड म्हणाले.

Ramdas Athavale asked Pichad
रामदास आठवले म्हणाले, `त्या`मुळे  तत्त्वांशी तडजोड करावी लागते

यावर आठवले म्हणाले, ज्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी इंग्रज राजवटीला जेरीस आणले त्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव विल्सन डॅमला द्यावे ही राज्यातील आदिवासी जनतेची माफक अपेक्षा आहे. आपण एकदा दिल्ली दरबारी येण्याचे आठवले यांनी निमंत्रण दिले.

आदिवासी समाजाचे केंद्रीय पातळीवरील प्रश्न मला सांगा मी पाठपुरावा निश्चित करेल. तुमचे राज्य मंत्रिमंडळातील काम अविस्मरणीय होते. राज्यातील आदिवासीच्या विकासात तुमचा सिंहांचा वाटा आहे. हे मी जवळून पाहिले तर वैभवला सांगा पराभवाने खचायचे नसते उलट उभारी घेऊन काम करायचे पद असतात जातात त्यालाच लोकशाही म्हणायंच. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेणारे आहे. तालुक्यात माझा पक्ष तुमच्यासोबत आहे असा आश्वासन आठवले यांनी दिला.

Related Stories

No stories found.