राम शिंदेंची कडी : अहिल्यादेवींना पहाटेच केले अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (Ram Shinde) यांना निमंत्रित केले नाही.
राम शिंदेंची कडी : अहिल्यादेवींना पहाटेच केले अभिवादन
Ram ShindeSarkarnama

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी येथे होत आहे. या जयंती उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde) यांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे नाराज असलेल्या राम शिंदेंनी काल (सोमवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांवर टीका केली. एवढ्यावरच राम शिंदे हे न थांबता त्यांनी आज पहाटे जयंती उत्सव सुरू होण्यापूर्वीच असे काही केले की त्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. (Ram Shinde's link: I went to the memorial in the morning and greeted Ahalya Devi)

अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात निमंत्रित न केल्याने राम शिंदे या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. असे असले तरी आज पहाटे ते घराबाहेर पडले. त्यांनी सहकुटुंब चौंडीतील अहिल्येश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात जाऊन अहिल्यादेवींना अभिवादन केले. या संदर्भातील फोटोही त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यामुळे जयंती उत्सवा आधीच राम शिंदे चर्चेत आले आहेत.

Ram Shinde
विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे 9 वे वंशज असल्याचे सांगितले जाते. पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी 31 मे 1996 ला सुरू केला. हा जयंती उत्सव त्यांनी 20 वर्षे म्हणजे 2015 पर्यंत साजरा केला. त्यानंतर जानकरांनी हा जयंती उत्सव मुंबईत सुरू केला. येथेच 31 मे 2003 साली जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली.

2007 पासून जयंती उत्सवात येणाऱ्या भाविकांना पाणी व भोजनाची सोय राम शिंदे करू लागले. 2013 व 2014 मध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे या जयंती उत्सवात सहभागी झाले होते. 2016 पासून राम शिंदे यांनीच जयंती उत्सवाची धुरा संभाळली होती. पालकमंत्री झाल्यावर राम शिंदे यांनी या उत्सवाला शासकीय स्वरूप दिले. मात्र मागील दोन वर्षांत कोरोना निर्बंधामुळे हा उत्सव होऊ शकला नाही.

Ram Shinde
राम शिंदे म्हणाले, अहल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवात रोहित पवारांनी राजकारण घुसडले...

शरद पवार आणि चौंडी

रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार झाले तसेच राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे अहिल्यादेवींचा शासकीय जन्मोत्सवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते दिसू लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे चौंडीत केवळ एकदाच आले आहेत. तेही 8 सप्टेंबर 2013 ला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला. त्यानंतर थेट आज शरद पवार या चौंडीत येणार आहेत. अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात सहभागी होण्याचा ही त्यांची पहिलीच वेळ आहे. मंत्री छगन भुजबळ हे 2012 साली या जयंती उत्सवात आले होते. मात्र आजच्या कार्यक्रमात राम शिंदे यांनी बोलावण्यात आलेले नाही. राम शिंदे हे चौंडी गावातच राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in