राम शिंदे म्हणाले, कर्जतमधील मतदार याद्यांत छेडछाड करण्यात आली आहे...

राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांचे नाव न घेता टीका केली.
Ram Shinde, Rohit Pawar
Ram Shinde, Rohit PawarSarkarnama

कर्जत ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगरपंचायतीचाही समावेश आहे. त्यामुळे कर्जतमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांचे नाव न घेता टीका केली. Ram Shinde said voter lists in Karjat have been tampered with

पत्रकार परिषदेला भाजपचे येथील निवडणूक निरीक्षक बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, पप्पू धोदाड व गणेश पालवे, सुमीत दळवी उपस्थित होते.

Ram Shinde, Rohit Pawar
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

राम शिंदे म्हणाले की, नगरपंचायतीसाठी आपल्या सत्तेच्या काळात 151 कोटींचा विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलू शकलो, याचे समाधान आहे. आगामी निवडणुकीत याच विकासकामांच्या जोरावर मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपची सत्ता कायम राखण्यात सहकार्य करतील, असे राम शिंदे यांनी सांगितले.

शिंदे पुढे म्हणाले, की मागील निवडणुकीत एकहाती सत्ता दिली. त्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्ण करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात यशस्वी झालो. येथील पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यश मिळाले. ग्रामदैवत संत श्री सद्‌गुरू गोदड महाराज मंदिर परिसर-बाजारतळ या ठिकाणी पेव्हर ब्लॉक, अद्ययावत स्मशानभूमी, विविध प्रभागांत सिमेंटचे रस्ते, स्वच्छतेसाठी वाहतूक यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, दोन भव्य बगीचे, चौकसुशोभीकरण, जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे, अशी अनेक विकासकामे केली.

Ram Shinde, Rohit Pawar
राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...

आगामी निवडणुकीत विजयाची खात्री नसल्याने, तसेच समोर पराभव दिसू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून, प्रभागानुसार मतदारयाद्यांत छेडछाड करण्यात आली आहे. यासह दबावाच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी शहराच्या शेजारील खेडेगावामधील लोकांचा यामध्ये समावेश केला असल्याचे निदर्शनास आले आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com