राम शिंदे म्हणाले, ते आता जनतेचा भुलभुलैय्या करीत आहेत

करमाळा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून होणार आहे. या कामाचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी केले होते.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama

अहमदनगर - करमाळा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून होणार आहे. या कामाचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी केले होते. हे काम सुरू व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. तर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनीही हे काम व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहेत. या मुद्द्यावर आता माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. ( Ram Shinde said, they are now confusing the people )

अहमदनगर जिल्हा परिषद व कर्जत पंचायत समितीची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने भाजपने आपली राजकीय तयारी सुरू केली आहे. मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे काल ( शुक्रवारी ) पंचायत समिती गणाच्या बुथ अध्यक्ष व शक्ती प्रमुख यांच्या आढावा बैठक राम शिंदे यांनी घेतली. या बैठक बोलताना त्यांनी आमदार रोहित पवारांना टीके लक्ष्य केले. या प्रसंगी हरिदास केदारी, संपत बावडकर, अभिजित जवादे, कैलास बोरुडे, दादा घोडेस्वार यांचीही भाषणे झाली. यावेळी शेखर खरमरे, तात्या खेडकर, पंडा बोरुडे, पप्पू धोदाड, विठ्ठल अनुभुले, लहू ओतारे, सारंग घोडेस्वार आदी उपस्थित होते.

Ram Shinde
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

राम शिंदे म्हणाले की, करमाळा महामार्गाच्या कामासाठी भाजप सत्तेत असलेल्या केंद्राचा निधी आहे. या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माझ्यासाहित अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा करण्यात येत आहे. कर्जत तालुका भाजप यांच्या मिरजगाव येथील आंदोलनामुळे गती मिळून तो आता प्रगतीवर आहे. मात्र फोटो सेशन आणि सोशल मीडियात येणाऱ्या पोस्ट आणि केला जाणारा भ्रम आता जनतेच्या लक्षात येत आहे.

Ram Shinde
रोहित पवार-राम शिंदे, पिचड, लंके, औटी यांच्या गावातील मतदानाकडे लक्ष

राम शिंदे पुढे म्हणाले की, राज्य सरकारने लाईट आणि उसाच्या प्रश्नावर ही या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. कर्जत-जामखेडमध्ये मागील अडीच वर्षांत मोठं काम सांगायला नसल्याने ते आता जनतेचा भुल भुलैय्या करीत आहेत. भाजपने मंजूर केलेल्या मिरजगाव पाणीपुरवठा योजनेच ही तांत्रिक कारण घेऊन श्रेय घेण्याचा घाट चालू आहे. मात्र जनता आता हुशार झाली आहे आणि ती आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मतपेटीतून व्यक्त होईल, असे राम शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com