राम शिंदे म्हणाले, अहल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवात रोहित पवारांनी राजकारण घुसडले...

चौंडी येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांना बोलावण्यात आले नाही.
Ram Shinde, Rohit Pawar
Ram Shinde, Rohit Pawar Sarkarnama

मुंबई - चौंडी येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांना बोलावण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. ( Ram Shinde said, Rohit Pawar got involved in politics during Ahalya Devi Holkar's birthday celebrations ... )

राम शिंदे म्हणाले की, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आखला आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात आहे असा आरोप राम शिंदे यांनी केला.

Ram Shinde, Rohit Pawar
रोहित पवारांनी आम्हाला अहिल्यादेवींच्या जयंतीची परवानगी मिळू दिली नाही : राम शिंदे

ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव आजवर सर्व पक्ष, संघटनांच्या मार्फत एकत्रित केला जातो आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर स्थानिक आयोजन समित्या स्थापन केल्या जात असत. या समित्यांत सर्व पक्षाच्या, सर्व विचारांच्या कार्यकर्त्यांना, विविध संघटनांना प्रतिनिधीत्व दिले जात असे. जयंती उत्सव कोणा एका पक्षामार्फत नाही तर सर्वामार्फत साजरा व्हावा असा हेतू यामागे आहे. मात्र यावर्षीची 297 वी जयंती साजरी करताना या उत्सवात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजकारण घुसडले, असा आरोप त्यांनी केला.

Ram Shinde, Rohit Pawar
विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

यावर्षीचा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य अथवा स्थानिक स्तरावर कोणतीही बैठक न घेता राष्ट्रवादी नेतृत्वाने स्थानिक प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे प्रशासनाने जयंतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या समाज बांधवांना महाप्रसाद देण्यातही आडकाठी केली गेली आहे. जयंती उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत, झेंडे फडकत आहेत. यातून हा जयंती उत्सव राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसते आहे. आजवर या जयंती उत्सवाकडे लक्ष न देणाऱ्या पवार कुटुंबीयांनी अचानक यावर्षी या जयंतीच्या आयोजनात रस घेऊन त्याला पक्षीय रूप दिले आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com