राम शिंदे म्हणाले, एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama

सिद्धटेक ( जि. अहमदनगर ) - कर्जत व जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. काल ( शनिवारी ) जामखेडमधील भाजपचे काही महत्त्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राम शिंदे यांनी गेलेल्यांची परवा न करता पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यायला सुरवात केली आहे. ( Ram Shinde said, once a mistake is made, voters do not repeat it ... )

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राम शिंदे यांनी सिद्धटेक येथे भाजपची बैठक घेतली. कुळधरण जिल्हा परिषद गटातील गणप्रमुख, गटप्रमुख तसेच शक्तीकेंद्रप्रमुख यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टीका केली. या प्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, सरचिटणीस सचिन पोटरे, शांतीलाल कोपनर, पप्पूशेठ धोदाड, नागनाथ जाधव, चिंतामणी सांगळे, बंडा मोरे, सचिन बनकर, रमेश शेळके, दत्तात्रय मांढरे, नारायण माळशिकारे तसेच कुळधरण गटातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Ram Shinde
राम शिंदे म्हणाले, ते आता जनतेचा भुलभुलैय्या करीत आहेत

राम शिंदे म्हणाले, "एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत. ती चूक चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात आलेली आहे. ज्याप्रमाणे 'ड्रॉप'सारखा प्रसंग एकदाच घडतो. पुढील वेळी सावधगिरी बाळगली जाते. त्यामुळे ती चूक पुन्हा होत नाही. तशा प्रकारे 'राष्ट्रवादी'च्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही असाच 'ड्रॉप' झालेला आहे, अशी भावना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केल्या.

Ram Shinde
ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

सचिन पोटरे म्हणाले की, कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा सत्तेत येणार, हाच राजकीय अंदाज होता. त्यामुळे 'राष्ट्रवादी'ने फोडाफोडीचे राजकारण केले.परंतु लोकांना आता त्यांची चूक पूर्णपणे लक्षात आलेली आहे.त्यामुळे आगामी काळात कर्जत-जामखेड भाजपमय झालेला असेल. गटातील कार्यकर्त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सिद्धटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, बेलवंडी, दुधोडी, भांबोरा, हिंगणगाव, राजू, बाभुळगाव यापरिसरातील रस्त्यांची कामे, गणेशवाडीतील 33 केव्ही वीज उपकेंद्र अशा अनेक कामांच्याबाबतीत या बैठकीत चर्चा झाली.

Ram Shinde
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

...आता मध्यस्थ नको..!!

कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्यांची कोणत्याही प्रकारची जाण नसताना इतर ठिकाणाहून येऊन केवळ दडपशाहीने विजय मिळवणारांना आगामी काळात जनमतातूनच चांगली चपराक बसणार असल्याचे राम शिंदे म्हणाले. त्यासाठी बूथ सक्षम करणार आहोत. शक्तिकेंद्र मजबूत करायची आहेत. हे करीत असताना यापुढे कोणत्याही मध्यस्थाची मदत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com