राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...

उत्तरप्रदेशातील ( UP ) लखीमपूर ( Lakhimpur ) येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या व काँग्रेसच्या ( Congress ) नेत्या प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून आज राज्यभर आंदोलने होत आहेत.
राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...
Ram ShindeSarkarnama

अहमदनगर : उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून आज राज्यभर आंदोलने होत आहेत. कर्जत येथे कापरेवाडीतील माय मोरताब देवीच्या पाचव्या माळेच्या मानाची आरती झाल्यानंतर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी भाविकांबरोबर पोत खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाविकास आघाडीच्या आंदोलना विषयी विचारले असता त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. Ram Shinde said, his experiment of Maharashtra Bandh failed...

राम शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीकडून लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता. त्या घटनेची सखोल चौकशी आणि आरोपीला अटक करण्यासंदर्भात योग्यती कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही महाराष्ट्र बंदची हाक सपशेल अपयशी ठरली आहे. परंतु काही प्रमाणामध्ये पोलिस, प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून दबावाखाली हा बंद करण्यात आला आहे.

Ram Shinde
राम शिंदे म्हणतात, ठाकरे सरकार शेतकरीद्रोही

ते पुढे म्हणाले, वास्तविक या सरकारच्या माध्यमातून मागील 2 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना काही मिळालेले नाही. राज्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. कोरोना महामारीत जे लोक दगावले त्यांना अडचणी आल्या. त्यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही.

मागील दोन वर्षांत कोरोना लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र बंद असताना ही बंदची हाक देणे अतिशय चुकीचे आहे. राज्य सरकार ढोंगी आहे. राज्य सरकार दिशाभूल करतेय. त्यामुळे हा त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला आहे, असा आरोपही राम शिंदे यांनी केला.

Related Stories

No stories found.