मोठी बातमी : आमदार राम सातपुतेंच्या गाडीला अपघात; फडणवीसांच्या सभेला जाताना दुर्घटना

Ram Satpute | पुणे-पंढरपूर मार्गावरील वेळापूर याठिकाणी अपघात
Mla Ram Satpute
Mla Ram SatputeSarkarnama

सोलापूर : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सायंकाळी टेंभूर्णी येथील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेला जाताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने यात कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसून आमदार सातपूते आणि त्यांचे सहकारी सुखरुप आहेत. सर्व जण दुसऱ्या गाडीने टेंभूर्णीला सभेसाठी रवाना झाले आहेत. (Ram Satpute Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आज संध्याकाळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेची सांगता सभा आज पार पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेची समारोप होत आहे. याच सभेला भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते जात होते.

या दरम्यान पुणे-पंढरपूर मार्गावरील वेळापूर याठिकाणी सायंकाळी टॅक्ट्रर आडवा आल्याने आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात झाला. यात सातपुते यांच्या MH12 SK 0040 ही गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. मात्र सुदैवाने यात कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसून आमदार सातपूते आणि त्यांचे सहकारी सुखरुप आहेत. सर्व जण दुसऱ्या गाडीने टेंभूर्णीला सभेसाठी रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com