रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

राज्याच्या राजकारणात State Politics रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता ते देशाच्या राजकारणात In the country's politics आपली चुणूक दाखवतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या NCP Leaders नेत्यांना आहे.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती व सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आता देशाच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यकारी समितीवर निवड केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी काल जाहीर झाली. यावेळेस सातारा जिल्ह्यातून दोघांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे. त्यांना कार्यकारी समितीत स्थान देण्यात आले आहे.

Ramraje Naik Nimbalkar
रामराजे नाईक निंबाळकरांची हॅटट्रीक ; फलटणमध्ये जल्लोष

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातील हुशार आणि जाणत्या नेत्यांना राष्ट्रीय कमिटीवर स्थान दिले आहे. आता कार्यकारी समितीवर निवड झाल्यामुळे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राज्यांच्या राजकारणानंतर आता देशाच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ramraje Naik Nimbalkar
NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

राज्याच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता ते देशाच्या राजकारणात आपली चुणूक दाखवतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com