चंद्रकांतदादांना बीजमाता राहिबाईंनी पाठविली अनोखी राखी!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांना पद्मश्री राहिबाई पोपेरे या भाऊ मानतात.
Chandrakant Patil & Rahibai Popere
Chandrakant Patil & Rahibai PopereSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - रक्षाबंधन सण उद्या आहे. त्यानिमित्त बहिणींकडून भावांसाठी राखी खरेदी केली जाता आहे. दूर राहणाऱ्या सासूरवासिनी भगिनी या भावांना पत्राद्वारे राख्या पाठवत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांना पद्मश्री राहिबाई पोपेरे या भाऊ मानतात. त्यामुळे पोपेरे यांनी चंद्रकांत दादांच्या मुंबईतील पत्त्यावर राखी पाठवून दिली आहे.

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया ! या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. अगदी या गीताला शोभेल असेच अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे.

Chandrakant Patil & Rahibai Popere
Shivsena: बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा धक्का!

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या राहिबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे. राहिबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे.

Chandrakant Patil & Rahibai Popere
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

चंद्रकांत पाटील राहिबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहिबाई सुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रुत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे.

बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहिबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com