सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टींचा इशारा

''राज्य सरकारची (Uddhav Thackeray) मदत अद्यापही काही ठिकाणी पोहचली नाही. महाविकास आघाडीमधील नेत्यांना दिवाळी करून देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे.यावेळी दिला.  
Raju Shetty
Raju Shettysarkarnama

सांगली : दोन्ही सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. एक रकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहोत. मात्र, केंद्र सरकारने तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकारने वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी (FRP) देऊ असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. आम्ही याना गुडघे टेकायला लावू आणि एक रकमी एफआरपी घेऊ असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे. राजू शेट्टी सांगलीमध्ये शिवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उद्धघाटन प्रसंगी बोलत होते. 

राजू शेट्टी म्हणाले, ''सव्वा दोन महिने उलटून गेले तरीही अद्यापही पूरग्रस्तांना सरकाने मदत दिलेली नाही. आता केंद्र सरकारच पथक महाराष्ट्रात येणार आहे. मला कळत नाही आता येऊन हे पथक काय पाहणार आहे. यांच्या याप्रकारावरुन समजते की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती तळमळ आहे. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.''

Raju Shetty
धक्कादायक : शाहरुखचीच इच्छा, 'मुलानं ड्रग्स घ्यावेत'

''राज्य सरकारची (Uddhav Thackeray) मदत अद्यापही काही ठिकाणी पोहचली नाही. आम्ही यासाठी जलसमाधी आंदोलन केले, अजून काय करायचे तेव्हा सरकार मदत करणार,'' असा सवाल शेट्टी यांनी सरकारला केला. महाविकास आघाडीमधील नेत्यांची दिवाळी करून देणार नाही, असा इशारा त्यांनी (Raju Shetty)यावेळी दिला.  

शेतकरी आत्महत्यांवर राजू शेट्टी म्हणाले की, उत्पादना पेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com