Raju Shetti News : ठरलं ! हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा 'स्वाभिमानी' लढवणार; राजू शेट्टींची घोषणा..

Kolhapur News : लोकसभेचा कोणत्या स्वाभिमानी जागा लढवणार?
Raju Shetti : Kolhapur News :
Raju Shetti : Kolhapur News : Sarkarnama

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा (swabhimani shetkari sanghatana) आता मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. पक्षाचे सर्वेसेवा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

राजू शेट्टी यांनी पाच जागा लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी, हातकणंगले जागेव्यतिरक्त इतर चार ते पाच लोकसभेच्या कोणत्या असणार आणि कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र पाच जागा कोणत्या लढवायच्या याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे, शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti : Kolhapur News :
Nitin Gadkari news Update: नितीन गडकरींना धमकी; बंगळूरमधून तरुणी ताब्यात..

राजू शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो होतो. भाजपपासून तर यापूर्वीच बाहेर झालो आहोतच. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. आमची रस्त्यावरची लढाई अजूनही संपलली नाही. केंद्र सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार लोकशाहीविरोधात चालू आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे शे्ट्टींनी सरकारला इशाराच दिला आहे.

"मी हमीभावाचा कायदा मांडला होता. मात्र शेतकऱ्यांठीचा हा कायदा अद्यापही प्रतीक्षेत आहे. तो अजूनही प्रलंबितच आहे. शेतकऱ्यांचे समस्या, त्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. याबाबत मात्र कोणत्याच सभागृहात नुसती चर्चा देखील केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजेत," असे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti : Kolhapur News :
Karad : शिक्षकांवरील अशैक्षणिक भार कमी करा : श्रीनिवास पाटलांची लोकसभेत मागणी

स्वाभिमानीचा धडक मोर्चा :

दरम्यान, शेतीसाठा दिवसा किमान 12 तास वीज उपवलब्ध व्हावी, वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टळावे, शेतीचं संरक्षण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातील शाहूवाडी तहसील कार्यालयावर मंगळवारी २१ मार्च रोजी, मोर्चा नेणयात आला होता. आमच्या मागण्यांची पूर्ती मुदतीत न झाल्यास, पुन्हा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराच शेट्टींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in