Raju Shetti News: सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना शेट्टींनी फटकारलं

Swabhimani Farmers' Association : सत्ताधारी मूग गिळून गप्प का?, शेट्टींचा सवाल
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama

Swabhimani Shetkari Sanghatana: 'राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी होत आहे. कांदा आणि कापसाच्या दरावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून सभागृहामध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळत आहे.

आता याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आक्रमक झालेत. ''आताच्या सत्ताधाऱ्यांनी तेंव्हा विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला होता. पण आता सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ असूनही ते मूग गिळून गप्प आहेत?, असं म्हणत शेट्टींनी सरकारवर ताशेरे ओढले.

Raju Shetti
Supreme Court hearing : सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण : तर शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नसते...

याबरोबरच त्यांनी महाविकास आघाडीवरही नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतो. सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, असा घणाघात त्यांनी केला.

काय आहे राजू शेट्टींचे ट्विट?

''गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहून समाधान वाटलं. पण, हेच विरोधी पक्ष जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा भूमिअधिग्रहण, दोन टप्प्यातील एफ.आर.पी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगलं होतं''.

Raju Shetti
Ambadas Danve News : राऊतांचे समर्थन नाही, पण विरोधी पक्षाने कोणता देशद्रोह केला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे..

''तेंव्हा आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला व सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांनो, राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात'', असं राजू शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com