'गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत तोंडघशी पडले'

एसटीचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन वेगळे असते
'गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत तोंडघशी पडले'
Raju Shetty

मुंबई : राज्य सरकारने एसटी संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने त्यांनी संप मागे घेणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीदेखील उडी घेतली होती. मात्र राज्य सरकारच्या घोषणेनंतर त्यांनी या संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

त्यानंकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ''शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. एसटीचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन वेगळे असते, याचा गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत यांना तोंडघशी पडावे लागले,अशी खोचक टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetty
पार्टीनं केला घात; मेडिकल कॉलेजमधील 182 जणांना कोरोनाचा विळखा

“आपण ज्यांचे नेतृत्त्व केले त्यांच्या अपेक्षा भरपूर वाढून ठेवल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मग शेवटी चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघच आहे. वाघावर स्वार होणे सोपे असते. पण, एकदा स्वार होऊन परत पायउतार होणे अवघड असते. अन्यथा वाघ चिडला, तर मग वाघाने ज्याला आपल्यावर स्वार केलेले असते. त्याला तो खाऊ टाकायलाही मागेपुढे बघत नाही,” असे सांगत राजू शेट्टी यांनी पडळकर आणि खोतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपाचा तिढा सोडवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ करण्याची घोषणा केली. यात एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या पगारात सुमारे ७२०० रुपयांपासून ३६०० रूपयांपर्यत वाढ करण्यात आल्याचे मंत्री परब यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे अशी विनंतीही केली आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून एसटी विलीनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in