Raju Shetti's Big Announcement : राजू शेट्टींची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोठी घोषणा

आम्ही ‘राईट टू एज्युकेशन’चा कायदा संसदेत मंजूर केला. पण हे शिक्षण गोरगरिबांच्या पोरांना परवडतं का, याचा आम्ही कधीही विचार केलेला नाही
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

कोल्हापूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरं दत्तक घेऊन त्यांना किमान पदवीपर्यंत शिक्षण द्यायचे, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही एका आश्रमाची उभारणी करत आहोत, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. (Raju Shetti's big announcement for the children of suicide Farmer victims)

कोल्हापूर (Kolhapur) येथे पहिले नांगरट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनात बोलताना माजी खासदार शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. या संमेलनाला अध्यक्ष म्हणून कवी विठ्ठल वाघ उपस्थित होते. तसेच, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Raju Shetti
Katraj Dudh Dairy : वडिलांची हुकलेली अध्यक्षपदाची संधी...मुलगा साधणार का?

राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, मी एका आश्रमाची उभारणी करतो आहे. कदाचित पुढच्या नांगरट साहित्य संमेलनापर्यंत त्याचे उद्‌घाटनही होईल. कारण, या पोरांना आधार देणे गरजेचे आहे. वडिल नसलेल्या पोरांचे हाल काय होतात, हे आपण समाजात बघत असतो. त्याच्या आईचे हाल किती होतात, हेही आपल्या दिसत असते.

Raju Shetti
Martand Devsthan Trustee Issue : देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून राज ठाकरे जेजुरीकरांना न्याय मिळवून देणार

आपल्या आधीच्या पिढीने म्हणजे राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, बापूजी साळुंखे या सर्व महान विभूतींनी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत, यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आहेत. आम्ही ‘राईट टू एज्युकेशन’चा कायदा संसदेत मंजूर केला. पण हे शिक्षण गोरगरिबांच्या पोरांना परवडतं का, याचा आम्ही कधीही विचार केलेला नाही, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली.

Raju Shetti
NCP OBC Melava : अहमदनगरचे नामांतरण घाईघाईने करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीसांनी का घेतला?; जयंत पाटलांनी सांगितले कारण....

सध्याचे शिक्षणसुद्धा गोरगरिबांच्या पोरांना दुरापस्त झालेले आहे. मग, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं काय होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरं दत्तक घ्यायची आणि त्यांना किमान पदवीपर्यंत शिक्षण द्यायचे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या आश्रमाची उभारणी करत आहोत, असेही शेट्टी यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com