Shetti-Patil News : भालकेंच्या ‘त्या’ विधानानंतर राजू शेट्टी-अभिजित पाटलांची बंद खोलीत तासभर चर्चा

भगिरथ भालके यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सोबत घेऊन समविचारी घाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे विधान केले हेाते.
Bhagirath Bhalke-Abhijit Patil-Raju Shetti
Bhagirath Bhalke-Abhijit Patil-Raju ShettiSarkarnama

पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्यात पंढरपूरच्या (Pandharpur) शासकीय विभागृहात बंद खोलीत तासभर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी मंगळवेढ्यात ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढविणार’ असे सूतोवाच केले. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी-पाटील यांच्या भेटीची चर्चा पंढरपुरात रंगली आहे. (Raju Shetti and Abhijit Patil closed room discussion in Pandharpur)

Bhagirath Bhalke-Abhijit Patil-Raju Shetti
मोठी बातमी : राष्ट्रवादीला मोठा धक्का; लोकसभेतून खासदार बडतर्फ, संख्याबळ घटले

मंगळवेढ्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सोबत घेऊन समविचारी घाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे विधान केले हेाते. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Bhagirath Bhalke-Abhijit Patil-Raju Shetti
Congress Leader Join BJP : पुण्यात काँग्रेसला हादरा : किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपत प्रवेश

त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १४ जानेवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांची शासकीय विश्राम गृहावरील बंदखोलीत तासभर चर्चा झाली. त्यांच्या या भेटीची पंढरपूर तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे. राजू शेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील आणि राजू शेट्टी यांची भेटी झाली का अशी ही चर्चा आता सुरु झाली आहे.

Bhagirath Bhalke-Abhijit Patil-Raju Shetti
Nashik Graduate Constituency : उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपवर डाव उलटवणार : ‘या’ उमेदवाराला देणार पाठिंबा?

या भेटीबाबत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना विचारले असता, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. एक शेतकरी म्हणून मी त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो होते. या वेळी साखर कारखान्यांच्या अडीअडचणींसंदर्भात चर्चा झाली. राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. भालके-परिचारक यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आणि अभिजित पाटलांच्या भेटीला विशेष महत्व आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in