राजेश टोपे म्हणाले, रोहित पवार राष्ट्रवादीचे स्टाईल आयकॉन

मंत्री राजेश टोपे यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या कामांची मुक्तकंठाने स्तुती केली.
राजेश टोपे म्हणाले, रोहित पवार राष्ट्रवादीचे स्टाईल आयकॉन
Rajesh ToteSarkarnama

अहमदनगर - कर्जत व जामखेड येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांची उद्घाटने झाली. या प्रसंगी बोलताना मंत्री राजेश टोपे यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या कामांची मुक्तकंठाने स्तुती केली. ( Rajesh Tope said, Rohit Pawar is the style icon of NCP )

राजेश टोपे म्हणाले, सर्वसमान्यांना आधार वाटावा अशा आरोग्यसेवेच्या पायाभरणीचे काम झाले आहे. रोहित पवार हे उद्याचे राज्याचे होऊ घातलेले मोठे नेतृत्त्व आहेत. कर्जतच्या वैभवात भर घालणारी आयकॉनिक इमारत तयार करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. पवार तिथे काय उणे. त्यांचे व्हिजन मोठे असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

Rajesh Tote
रोहित पवार म्हणाले, भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केलय...

ते पुढे म्हणाले की, माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेते मतदार संघात विकासाचे काम आमदार रोहित पवार पुढे घेऊन जात आहे. त्यांचे समाजिक काम राज्यभर होत आहे. रोहित पवार म्हंटले की गळ्यात गमछा अथवा अंगात जॅकेट असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टाईल आयकॉन आहेत. मी लहानपणी पासून कर्जत तालुक्यात येतो. या तालुक्यात आता बदल दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यात उसाचे उत्पन्न वाढत आहे. अजित पवारांच्या माध्यमातून अंबालिका कारखाना चालविला जात आहे. मी दोन वेळा त्या कारखान्याला भेट दिली. कारण अजित पवारांची शिस्त, त्यांचा निटनेटकेपणा यातून खूप शिकण्यासारखे आहे. बारामती अॅग्रो व इतरांच्या माध्यमातून तालुक्यातील ऊस शिल्लक राहणार नाही. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात बारामती अॅग्रोने दुसरे युनिट सुरू केले आहे. त्यामुळे माझ्या परिसरातील 25 लाख टन उसाचे गाळप होऊ शकले. सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे काम रोहित पवारांकडून होत आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Rajesh Tote
रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

रोहित पवार म्हणाले, मतदार संघात आरोग्य व शिक्षणावर जास्त भर दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले शिक्षण दिले तर उद्याचे सज्ञान नागरिक तयार होतील. त्यातून परिसराचा विकास होईल. त्याचवेळी आरोग्यही महत्त्वाचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची कर्जत-जामखेडमध्ये कमी होती. मंत्री टोपे यांना विनंती केल्यावर कर्मचारी मिळाले. केवळ चांगल्या सुविधा असून चालत नाही. त्याचवेळी पुरेसे कर्मचारी व डॉक्टरही आवश्यक असतात. 180 पेक्षा जास्त कोटी रुपयांची आरोग्य कामे कर्जत-जामखेड मतदार संघात आणली आहेत. बारामती प्रमाणे कर्जत-जामखेडही मेडिकल हब व्हावे, अशी अपेक्षाही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी मंत्री टोपे यांच्याकडे मतदारसंघासाठी डायलेसिस सेंटरची मागणी केली.

या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, डॉ. संजय घुगरे, जिल्हा परिषद सदस्य उमेश परहर, गुलाबराव तनपुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, संजय पवार, नामदेव राऊत, राजेंद्र गुंड, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.