Rajesh Tope : एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य ; टोपेंचं टि्वट

बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू !
Rajesh Tope : एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य ; टोपेंचं टि्वट
Rajesh Tope sarkarnama

मुंबई : बियाणे खरेदीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बियाणे विक्रेत्यांना विनंती केली आहे, याबाबत टोपे यांनी टि्वट केलं आहे. बियाणे विक्रेत्यांचे टोपेंनी कान टोचले आहेत.

"हा बळीराजा तुमच्यावर मोठा विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो.कोणत्याही तात्पुरत्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा विश्वास आपण तोडू नये, एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य आहे. या बियाण्यांच्या भरोशावर शेतकरी संपुर्ण वर्ष पिकांची वाट बघतात," असे टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Rajesh Tope
Rajya sabha Election : मतदानासाठी आमदारांना या नियमाचं पालन करावं लागतं..

"बियाण्यांच्या बाब शेतकऱ्यांची फसवणूकतीत होत असल्याच्या काही बाबी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. माझे सर्व दुकानदारांना विनंतीवजा आवाहन आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना योग्य त्या कंपनीचेच बियाणे द्यावे. शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणेच सुचवून खरेदी करण्याचा आग्रह करा.सर्व बियाणे दुकानदार हे सुद्धा एक शेतकरीच आहेत. बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू !" असे टोपे यांनी म्हटलं आहे.

"बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते. याची परिणीती म्हणून नंतरचे दोन ते तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो. हाच कर्जबाजारी शेतकरी मग जीवनात काहीतरी टोकाचा निर्णय घेतो. असे चित्र निर्माण होऊ नये म्हणूनच माझी सर्व बियाणे दुकानदारांना पुन्हा एकदा विनंती आहे,शेतकऱ्यांना योग्य त्या कंपनीचेच बियाणे द्या." अशी विनंती टोपेंनी केली आहे.

Rajesh Tope
काश्मिरी पंडितांचं हत्याकांड सुरु असताना मोदी, शहा सरकारची 8 वर्षे साजरी करण्यात मश्गूल

अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या बियाणे महोत्सवाला (Seed Festival) चांगला प्रतिसाद मिळाला. एक ते सहा जून या काळात महोत्सवात १०१७३ क्विंटल बियाण्याची विक्री (Seed Sale) झाल्याचा दावा कृषी विभागाने (Department Of Agriculture) केला आहे. या माध्यमातून २९ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचेही सांगितले जाते. दुसरीकडे याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता हा उपक्रम राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in