Rajesh Tope : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यदुत म्हणून काम करावे

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' या दोन दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama

महेश माळवे

Rajesh Tope : आत्तापर्यंतची सरकारे आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष करीत होती. मात्र, कोरोना काळानंतर केंद्र व राज्य सरकारला आरोग्यसेवेचे महत्व कळाले. त्यामुळे आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यदूत म्हणून काम करावे, असे आवाहन करताना माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी आरोग्यसेवेचा दहा कलमी कार्यक्रम कार्यकर्त्यांसाठी दिला.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' या दोन दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते बोलत होते. यावेळी प्रारंभी प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

Rajesh Tope
राजेश टोपे भाजपमध्ये जाणार? दानवेंशी गुप्त भेट

टोपे म्हणाले की, कोरोना काळात राज्यात ऑक्सिजन, रेमिडीसिवीरसारखी औषधी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले. त्यातून सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून केलेले काम इतर राज्यांप्रमाणे अनेक आरोग्यसंस्थांनी गौरविले.

आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे दरवर्षी साडेतीन ते पाच टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाईत लोटले जात आहेत. आरोग्यावर होणारा खर्च ५० टक्क्या पेक्षाही अधिक होत आहे, असे असताना राज्य व केंद्र सरकारनेही आरोग्यावर अधिक खर्च केला पाहिजे. अन्य देशात आरोग्यावरचा खर्च ५० टक्क्यांपेक्षा पेक्षाही कमी आहे. कोरोना काळात सर्वांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचा सर्वाधिक आधार मिळाला. त्यामुळे आज महाआघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गावोगावात उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र उभी राहिली आहेत. आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी हुडकोकडून दोन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध केले आहे. त्यातून अडीचशे कोटी रुपये सरकारला मिळाले असून या कामाचे पुढील काळात उद्घाटन होतील. परंतु, ही सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. ती जनतेपर्यंत पोचवावी लागतील, असे आवाहन त्यांनी केले.

Rajesh Tope
राजेश टोपे म्हणाले, रोहित पवार राष्ट्रवादीचे स्टाईल आयकॉन

५०० बेडची रुग्णालय उभी राहिल्यामुळे सात वैद्यकीय महाविद्यालय राज्यात उभी राहू शकली. आता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. यापूर्वी सरकारी दवाखान्यामधूनही मोफत रक्त पुरवठा केला जात नव्हता. मात्र, महविकास आघाडी सरकारचा काळात याबाबत निर्णय घेऊन मोफत रक्तपुरवठा सुरू केला असून याचा खर्च सरकार उचलते, असे त्यांनी सांगितले.

अलीकडील काळात हृदविकार, कॅन्सर याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅथलॅबची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अवयव प्रत्यारोपण हे पुढील काळात महत्वाचे आहे. सात प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करता येतात याची माहिती हवी. प्रत्यारोपण केंद्र वाढविल्याने अवयव प्रत्यारोपणात 2 ते 3 वर्षांत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Rajesh Tope
Video: ''कोरोना निर्बंध शिथिल करणार''; राजेश टोपे

दहा कलमी कार्यक्रम

निवडणुका जिंकायच्या असतील तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यसेवेची इत्यंभूत माहिती ठेवली पाहिजे. यासाठी टोपे यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र, रक्तदान करावे, ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र, क्षयरोगमुक्त महाराष्ट्र, मानसिक अजारमुक्त महाराष्ट्र, दिव्यांगांना अस्मिता अभियान प्रमाणपत्र देण्याचे काम करावे, राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियान, धर्मादाय हॉस्पिटलची यादी खिशात असली पाहिजे, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी जनारोग्य योजनेची माहिती असायलाच हवी, आरोग्यदूत अशी ओळख व्हावी, असा दहा कलमी कार्यक्रम यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in