मला मंत्री केले असते तर शिवसेनेचे आठ आमदार करून दाखवले असते : क्षीरसागरांची खंत

काँग्रेसला ही जागा सोडली असली तरी २०२४ मध्ये हा मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagarsarkarnama

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१४ निवडणुकीनंतर शिवसेना (shivsena)-भाजपचे (bjp) सरकार आले. त्या सरकारमध्ये मला मंत्री केले असते, तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार पडले नसते. उलट मी आपल्या सहा आमदारांचे आठ आमदार करून दाखवले असते, अशी सल कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागल्याने नाराज असलेले राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी बोलून दाखवली. (Rajesh Kshirsagar regrets not getting ministerial post in the shivsen-bjp government)

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने क्षीरसागर हे गेली दाेन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती. ‘नॉट रिचेबल’ क्षीरसागर आज (ता. २० मार्च) सायंकाळी कोल्हापुरात परतले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थासमोर मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. त्यावेळी क्षीरसागर यांनी आपल्या मनातील सल उघड केली.

Rajesh Kshirsagar
शिवसेनेचे पाच आमदार पाडणाऱ्या काँग्रेसला जागा सोडावी लागल्याचे दुःख मोठे

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी जर निवडून आलाे असतो तर मी पालकमंत्री होणार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करणार, या भीतीपोटी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपने माझा खोट्या पद्धतीने पराभव केला. ज्या काँग्रेस पक्षाने शिवसेनेचे पाच आमदार पाडले, त्यांनाच कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सोडावा लागत आहे, याचे मनस्वी दुःख आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rajesh Kshirsagar
उद्धव ठाकरेंच्या मनात असेल तेच होईल : नाराज क्षीरसागरांची तलवार म्यान!

शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाने ही पोटनिवडणूक लढवण्याचे ठरविले होते. महाविकास आघाडी करत असताना तीनही पक्षांनी एकत्र राहण्याचे ठरले होती. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी केली. त्याचे उत्तर त्यांनी शिवसेनेला देण्याची गरज आहे. त्याचवेळी संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांनी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी पक्षप्रमुखांना पटवून द्यायला हवे होते. पण तसे घडले नाही, हे माझे दुर्दैव आहे, अशी खंतही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलून दाखवली.

Rajesh Kshirsagar
रजा वाढविल्याबद्दल पोलिसांनी मानले गृहमंत्री वळसे पाटलांचे आभार!

शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

गोकुळमध्ये गरज होती, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी आघाडी केली. शिवसेनेमुळेच गोकुळमध्ये सत्ता आली. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत त्यांना आमच्याशी आघाडी नको आहे. त्यामुळे शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. काँग्रेसला ही जागा सोडली असली तरी २०२४ मध्ये हा मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना या वेळी केले.

Rajesh Kshirsagar
हे अजितदादांचे काम नाही, ते माझे काम आहे : शरद पवारांची गुगली!

‘मातोश्री’शी प्रामाणिक

मी ‘मातोश्री’शी कालही प्रामाणिक होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरोधार्ह मानून आम्ही काम करत असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी होताना जो निर्णय झाला आहे आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल, त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काम करण्यात येईल, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com