पराभवानंतरही कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले राजेश क्षीरसागर शिंदेंच्या गोटात सामील

Rajesh Kshirsagar | Shivsena | : राजेश क्षीरसागर यांचा २०१९ च्या निवडणुकीत झाला होता पराभव
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar Sarkarnama

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकवत एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश केला आहे. आज सकाळपासूनच ते नॉटरिचेबल होते. त्यानंतर संध्याकाळी ते गुवाहटीमध्ये पोहचले. क्षीरसागर यांच्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही शिंदे यांच्या गोटात प्रवेश केला आहे. दरम्यान राजेश क्षीरसागर हे मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजही होते. (Eknath Shinde Latest Marathi News)

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये मतदारसंघ काँग्रेसकडून पुन्हा शिवसेनेकडे घ्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली होती. २०१९ साली त्यांचा पराभव होण्यापूर्वी ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या मागणीसाठी ते दोन दिवस नॉट रिचेबल देखील होते. त्यामुळे ते बंड करणार असल्याच्या त्याचवेळी चर्चा होत्या. मात्र त्यानंतरही ठाकरे यांनी ही जागा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आग्रस्तव शिवसेनेकडे घेतली नाही, असा दावा करण्यात आला. अखेरीस आज क्षीरसागर यांनी बंड करत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी ते गुवाहटी इथे दाखल झाले आहेत.

शिंदे यांना भाजपचा पाठिंबा :

दरम्यान, एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आमदारांना सांगत आपले पत्ते ओपन केले आहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. आपल्याला कुठेही काहीही कमी पडणार नाही, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ते पुढे म्हणाले, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, कुठेही काही लागले तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचे. आपले सगळ्यांचे सुख, दु:ख सारखेच आहे. विजय आपलाच आहे, असे शिंदे म्हणाले. तो पक्ष महाशक्ती आहे. पाकिस्तानला त्यांनी धडा शिकवला आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com