राऊतांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा मावळा रुग्णालयात; शिवसंपर्क अभियानाला मुकणार

Rajesh Kshirsagar | Sanjay Raut : उद्यापासून संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagarsarkarnama

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरमधील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज सकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान अँजिओप्लास्टीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही क्षीरसागर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. (Sanjay Raut | Rajesh Kshirsagar Latest News)

राजेश क्षीरसागर शिवसंपर्क अभियानाला मुकणार

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन कोल्हापूर सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा नाकारुन शिवसेनेने कोल्हापूचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देवू केली. या सर्व घडामोडींनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत उद्यापासून (शनिवार) शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने ३ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते पक्षाच्या बैठका, मेळावे या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. या अभियानाच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तरची जागा २ वर्षांत दोनवेळा काँग्रेससाठी (Congress) गेल्यानंतर आता शहरातील शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा आपल्या गडाची बांधणी करुन तो काबीज करण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र आहे. सोबत आगामी काळातील कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हातील सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही शिवसेनेने शड्डू ठोकला आहे.

मात्र याच शिवसंपर्क अभियानाच्या आदल्या दिवशी राजेश क्षीरसागर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आजच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर पुढील किमाना आठवडाभर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानाला आणि संजय राऊत यांच्या दौऱ्याला राजेश क्षीरसागर मुकण्याची चिन्ह आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com