Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊत यांची १९ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता!

Rajendra Raut : पांगरी पोलिस ठाण्यात शिरीष जाधव यांनी फिर्याद दिली होती.
Rajendra Raut
Rajendra Rautsarkarnama

Rajendra Raut : कुसळंब (ता.बार्शी) येथे तत्कालीन शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद, दगडफेकीच्या प्रकारानंतरपांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास जात असताना झालेल्या खूनी हल्लाप्रकरणी बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सहा जणांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांनी शुक्रवारी (ता.६) रोजी निर्दोष मुक्तता केली.

Rajendra Raut
Ajit Pawar News : बारामतीत अजितदादांना प्रथमच प्रचंड सुरक्षा....; कारण काय?

आमदार राजेंद्र राऊत, विजय राऊत, सुधीर बारबोले, किरण तौर, चंद्रकांत पवार, राजा काकडे अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. ही घटना १९ एप्रिल २००४ रोजी कुसळंब येथे घडली होती. पांगरी पोलिस ठाण्यात शिरीष जाधव यांनी फिर्याद देताच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Rajendra Raut
Imtiaz Jalil : कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर निर्णयासाठी महिनाभराची डेडलाईन, अन्यथा..

तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तांबडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते फिर्यादी, जखमी साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. कोणताही सबळ पुरावा नसल्याचे संशयित आरोपींच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने मान्य करुन सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींच्या वतीने अॅड.सागर रोडे यांनी तर सरकारतर्फे अॅड.श्रीमती कदम यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com