सत्ता बदल होताच राजेंद्र राऊतांनी दाखवली ताकद; महिन्यातच आणला ९० कोटींचा निधी

या निधीतून बार्शी शहरातील तब्बल ११ रस्ते चकाचक आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.
Rajendra Raut
Rajendra RautSarkarnama

बार्शी : सत्ता बदल होताच बार्शीचे (Barshi) भारतीय जनता पक्ष समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आपली ताकद दाखवत तब्बल ९० कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून बार्शी शहरातील तब्बल ११ रस्ते चकाचक आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. याबाबतची माहिती आमदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. (Rajendra Raut brought a fund of 90 crores for 11 roads in Barshi)

आमदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, रस्ते विकास प्रकल्पंतर्गत हा ८९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी २५ जुलै रोजी याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मागील महाविकास आघाडी सरकारकडे निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत होतो. अखेर महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येताच तातडीने या कामांना मंजुरी मिळाल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.

Rajendra Raut
‘बारामती ॲग्रो’ला धक्का : आदिनाथ भाडेतत्वावर देण्यास २२ ऑगस्टपर्यंत कोर्टाचा 'ब्रेक'

गेल्या काही वर्षांत विरोधक अडचण निर्माण करीत होते, त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. पण, बार्शी शहरासाठी महत्वकांक्षी असलेली योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेच्या वतीने आभार मानतो, असेही राऊत यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

Rajendra Raut
‘दामाजी’च्या अध्यक्षपदी परिचारक समर्थक शिवानंद पाटील; कारखान्याची गाडी न वापरण्याचा निर्णय!

आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या अडीच वर्षांत भाजपशी एकनिष्ठ राहत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानले होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत राऊत हे भाजपबरोबरच होते. विशेषतः फडणवीस यांच्याशी त्यांची सलगी आहे. त्यामुळेच त्यांच्या मुलाच्या लग्नाला येऊ न शकलेल्या फडणवीसांनी पुन्हा खास राऊत यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे त्यांचे फडणवीस यांच्याबरोब असलेले सख्य अख्ख्या सोलापूर जिल्ह्याने पाहिले होते.

Rajendra Raut
मंत्रिमंडळ विस्तारास विलंब : मातब्बरांना डावलण्याची शिंदे-फडणवीसांची खेळी?

बार्शी शहरातील रस्ते आणि त्यांच्यासाठी मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे : गाडेगाव रोड ते आयटीआय (९ कोटी २० लाख ३५ हजार ४२९), एकविराई चौक ते मंगळवारपेठ (३ कोटी २४ लाख ६३ हजार ४६७), पिंपळगाव रोड ते उत्रेश्वर नाका (२ कोटी ९१ लाख ५८ हजार ८६०), पिंपळगाव रोड ते बायपास रस्ता (११ कोटी ६७ लाख ९८ हजार २४६), उपळाईरोड ते परांडा रोड (२ कोटी ४२ लाख १७ हजार ४२५), अलिपूर रोड, उपळाई रोड, नेने निर्सिंग होम (२ कोटी १४ लाख ६१ हजार २२९), ३० मीटर रिंगरोड ते व्हनकळस प्लॉट (११ कोटी ७७ लाख २० हजार २०१) गडशिंग कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद हद्द (३ कोटी ४४ लाख १३ हजार ४९), उपळाई रोड माढेश्वरी मंगल कार्यालय ते बायपास (७ कोटी ७९ लाख ६७ हजार १६४), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भोगेश्वरी मंदिर, ढगे मळा चौकपर्यंत (४ कोटी ८ लाख ८ हजार २५०), पोलिस स्टेशन ते नगरपरिषद ते पंचायत समिती कार्यालय (२० कोटी १२ लाख ७१ हजार ३७४) याप्रमाणे ८९ कोटी ५७ लाख रुपयांच्‍या निधीतून रस्‍ते चकाचक होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com