दोनच वर्षात यड्रावकर विरोधकांना पुरुन उरले; आमदार, मंत्री अन् जिल्हा बँकेवरही गेले

KDCC Bank Election update : शिरोळमधील राजेंद्र पाटील यड्रावकरांचा निकाल सगळ्यात चर्चेतील ठरला
Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil Yadravkar Sarkarnama

शिरोळ (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा बँकेचे निकाल आज जाहिर झाले. १८ जागांसह सत्तारुढ गटाने बाजी मारत किल्ला राखला. तर विरोधकांना अवघ्या ३ जागांवरच समाधान मानावे लागले. या सगळ्या निकालात सतेज पाटील (Satej Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), संजय मंडलिक (Sanjay Mandlik), अमल महाडिक (Amal Mahadik) अशा सगळ्या कसलेल्या राजकारण्यांनी अपेक्षेप्रमाणे आपले स्थान पक्के केले. मात्र सगळ्यात चर्चेतील निकाल ठरला तो शिरोळमधील राजेंद्र पाटील यड्रावकरांचा.

जिल्हा बँकेच्या शिरोळ तालुका विकास संस्था गटातून राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला. राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर विरोधातील उमेदवार आणि शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांना ५२ मते पडली. या निकालामुळे यड्रावकर आता शिरोळचे आमदार, राज्य सरकारमध्ये मंत्री आणि स्थानिक राजकारणावर पकड ठेवत जिल्हा बँकेवर संचालकही झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे दोन पराभव पाहिलेले यड्रावकर अवघ्या दोनच वर्षात विरोधकांना पुरुन उरले असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Rajendra Patil Yadravkar
राजू शेट्टींची २०१९ ला दिल्ली आणि २०२२ गल्लीही गेली!

राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी २००४ आणि २०१४ असे दोन विधानसभेचे पराभव बघितले. २०१९ मध्येही त्यांना अखेरच्या क्षणी तिकीट नाकारल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. मात्र त्यानंतरही २०१९ ला ३० हजारांच्या मताधिक्याने शिरोळच्या जनतेने यड्रावकरांना विधानसभेत पाठवले. यानंतर अवघ्या काहीच दिवसात यड्रावकरांना शिवसेनेच्या कोट्यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही मिळाले. पुढे आरोग्यासारख्या महत्वाच्या मंत्रालयची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

Rajendra Patil Yadravkar
सोळा वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या पराभवाचे सुधीर देसाईंनी काढले उट्टे!

कोल्हापूर जिल्हा बँकेचे (KDCC Bank Election) राजकारणातही यड्रावकर यांच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक राजकारणी एकवटल्याचे पाहायला मिळाले. तसेच शिरोळ तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही भूमिका बदलत यड्रावकर यांच्या विरोधात थेट कारखानदारांना साथ दिली. उमदेवार गणपतराव पाटील यांच्या बाजूने राजू शेट्टी यांनी ताकद उभी केली होती. मात्र राजू शेट्टी यांनी हिच भूमिका बदलणे कदाचित मतदारांच्या पचनी पडले नाही, आणि गणपतराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com