नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडेंच्या पॅनेलची सरशी

या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत थेट लढत आहे.
Rajendra Nagawade
Rajendra NagawadeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत थेट लढत आहे. काल ( शुक्रवारी ) मतदान प्रक्रिया झाली. आज मतमोजणी सुरू असून नागवडे यांचे किसान क्रांती मंडळ आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्याने मतमोजणीसाठी वेळ लागत आहे. Rajendra Nagwade's panel at Nagwade factory

आतापर्यंत 21 जागांपैकी 9 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व 9 जागांवर राजेंद्र नागवडेच्या किसान क्रांती मंडळाने विजय मिळविला आहे. हे सर्व विजयी उमेदवारांनी सहकार विकास मंडळाच्या उमेदवारांचा अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. राजेंद्र नागवडेही आघाडीवर असल्याचे चित्र असल्याने नागवडे समर्थक उत्साहात आहेत.

Rajendra Nagawade
नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

नागवडे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी शुक्रवारी (ता. 14) मतदान झाले. 19 हजार 822 पैकी 16 हजार 978 (86 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत पार पडले. 21 जागांसाठी 44 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज ( शनिवारी ) श्रीगोंदे शहरातील शासकीय गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान झाले. सत्ताधारी व विरोधी गटानेही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सभासदांना चांगलेच 'लक्ष्मीदर्शन' झाल्याची चर्चा आहे. परिणामी, मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यातच, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकेक मतदान घडवून आणण्यावर भर दिला.

Rajendra Nagawade
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा : संचालक मंडळाचे आवाहन 

सायंकाळी काही केंद्रांवर 5 वाजल्यानंतरदेखील मतदान सुरू होते. सकाळी सेवा संस्था मतदारसंघातील 41 मतदारांनी तहसील कार्यालयात मतदानाचा हक्क बजावला. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व बाळासाहेब नाहाटा यांच्यात ही लढत असल्याने लक्ष होते. दोन्ही बाजूंनी मतदारांना 'बंदोबस्ता'त आणण्यात आले. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे गटासमोर पाचपुते-मगर गटांनी एकत्र येत कडवे आव्हान उभे केल्याने, सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते या दिग्गज मंडळींचे भवितव्य काही तासात कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in