राजेंद्र नागवडे पुन्हा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष

या निवडणुकीत राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्यासमोर आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) व बाळासाहेब नाहाटा यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता.
Rajendra Nagawade
Rajendra NagawadeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्त्वाखाली किसान क्रांती मंडळाने सर्व जागा जिंकल्या. या निवडणुकीत राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्यासमोर आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) व बाळासाहेब नाहाटा यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागवडे यांनी बाबासाहेब भोस यांना बरोबर घेत विरोधकांचे आव्हान मोडित काढले. Rajendra Nagwade is again the president of Nagwade factory

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे किसान क्रांती मंडळाचे प्रमुख राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांची फेरनिवड झाली. तर उपाध्यक्षपदाची धुरा बाबासाहेब सहादू भोस यांच्याकडे सोपविण्यात आली. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत नागवडे गटाने सर्व एकवीस जागा जिंकत एकहाती वर्चस्व कायम राखले होते. परिणामी, दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. राजेंद्र नागवडे हे मागील 10 वर्षांपासून या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

Rajendra Nagawade
नागवडे, मुरकुटे यांनी कडवा विरोध मोडत राखले सहकाराचे बालेकिल्ले

नागवडे कारखान्याचे पदाधिकारी निवडण्यासाठी मंगळवारी (ता. 25) दुपारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अध्यक्षपदासाठी राजेंद्र नागवडे यांच्या नावाची सूचना सावता हिरवे यांनी मांडली. त्यास शरद जगताप यांनी अनुमोदन दिले.

उपाध्यक्ष पदासाठी बाबासाहेब भोस यांच्या नावाची सूचना प्रशांत दरेकर यांनी मांडली. त्यास भाऊसाहेब नेटके यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्हीही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने कारखान्याच्या अध्यक्षपदी राजेंद्र नागवडे व उपाध्यक्षपदी बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी केली.

दरम्यान, कारखान्याच्या पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी शहरात संचालक मंडळ व नागवडे गटाच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली. आगामी राजकारणाचा विचार करता उपाध्यक्षपदाची धुरा भोस यांच्याकडे सोपविण्याबाबत एकमत झाले.

Rajendra Nagawade
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

स्व. 'बापूं'चा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नेहमी सभासद हिताचाच कारभार केला आहे. सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवत त्यावर शिक्कामोर्तब केले. भविष्यातही सभासद व कामगारांच्या हिताचा कारभार करून कारखान्याचा नावलौकिक वाढवू.

- राजेंद्र नागवडे,नूतन अध्यक्ष

'बापूं'च्या आदर्शांवर सभासद हिताचा कारभार करून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू. आगामी काळात नागवडे कुटुंब जर विधानसभा निवडणुक लढले तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू.

- बाबासाहेब भोस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com