राजन पाटलांना सर्वाधिक संचालकांचा वाटा : हुरडा पार्टीत ठरली दूध पंढरीच्या निवडणुकीची रणनीती!

मंगळवेढ्यात दूध संघाच्या मतदारांची ओळख परेड करण्याचेही ठरले आहे.
solapur doodh sangh meeting
solapur doodh sangh meetingsarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत सर्वाधिक एकहाती मतदार मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील (rajan patil) यांच्याकडे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वात मोठा संचालकांच्या जागांचा वाटा त्यांना द्यावा. मंगळवेढ्यातही मतदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे दोन नंबरचा वाटा मंगळवेढ्याला, त्यानंतर माढा आणि सांगोल्याला वाटा देण्याबाबत आज प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. (Rajan Patil's group will get highest number of directors in Solapur jillha doodh sangh)

माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, सुरेश हसापुरे हे येत्या आठवड्यात मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या रविवारी (ता. 16 जानेवारी) मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांच्याकडे दूध संघाच्या मतदारांची ओळख परेड करण्याचेही ठरले असल्याचे समजते.

solapur doodh sangh meeting
गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे : एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

माजी आमदार दिलीप माने यांच्या तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील फार्म हाऊसवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज हुरडा पार्टी व त्यानंतर बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरविण्यात आल्याचे समजते. या बैठकीला आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक बबनराव आवताडे, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तब्येत ठीक नसल्याने आमदार संजय शिंदे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

solapur doodh sangh meeting
‘आमचं नवीन ठरलंय’ : संजय मंडलिकांच्या घोषणेने सतेज पाटलांना इशारा

आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे ठरले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांची येत्या आठवड्यातील वेळ मागण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नेते उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला बुधवारी (ता.12) जाण्याची शक्‍यता आहे.

solapur doodh sangh meeting
शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

समविचारींची मोट शिंदे-सोपलांच्या माध्यमातून बांधली जाणार

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आणि सुधाकरपंत परिचारक हे दोघे नेते एकत्रित बसून स्थानिक राजकारणाची मोट व्यवस्थित बांधत होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी श्रेष्ठी म्हणून आमदार बबनराव शिंदे आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या नावावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये समविचारींची मोट शिंदे-सोपल यांच्या माध्यमातून बांधली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com