राजन पाटलांचा भाजप प्रवेश लटकणार..?: धनंजय महाडिकांनी घेतली ही भूमिका

भाजपच्या वाटेवर असलेले राजन पाटील यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत महाडिक यांनी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले.
Dhananjay Mahadik-Rajan Patil
Dhananjay Mahadik-Rajan PatilSarkarnama

पंढरपूर : सोलापूरच्या (Solapur) राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) निवडणुकीत आमनेसामने आलेले खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यातील संषर्घ भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या (BJP) वाटेवर असलेले राजन पाटील यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत महाडिक यांनी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले. राजन पाटील यांच्यासारख्या प्रवृत्ती पक्षात येतील, याबाबत मी साशंक आहे, अशी भूमिका धनंजय महाडिक यांनी मांडली आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे काय होणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. (Rajan Patil's BJP entry will hang : Dhananjay Mahadik took this Stand)

खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुळूज मतदान केंद्रावर आज (ता. १३ नोव्हेंबर) मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी भीमा साखर कारखान्यासह पंढरपूर-मोहोळचे पुढील राजकारण, राजन पाटील यांचा भाजपप्रवेश यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

Dhananjay Mahadik-Rajan Patil
पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच असतात पोरं, त्याचा आम्हाला स्वाभिमान : राजन पाटलांचे वादग्रस्त विधान

गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुले भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. खुद्द राजन पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. मात्र, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारातील भाषण राजन पाटील यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांच्यासारख्या विकृतींना भाजपमध्ये प्रवेश मिळेल, याबाबत मी साशंक आहे, अशी भूमिका खासदार महाडिक यांनी घेतली आहे.

Dhananjay Mahadik-Rajan Patil
'अशा लोकांमुळे आम्हाला पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल' : उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्लाबोल

धनंजय महाडिक म्हणाले की, राजन पाटील यांनी ३०२ कलमाचे समर्थन करत महिलांचा अवमान केला आहे. ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांनी ३०२ कलमाचे समर्थन करून स्वतःचे अस्तित्व कशा पद्धतीचे आहे, याचा एकप्रकारे कबुली जबाब दिलेले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालत असणारा सुसंस्कृत पक्ष आहे. एका विचाराने आणि विकासाच्या भूमिकेने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पाटील यांच्यासारख्या विकृत प्रवृत्तींना पक्षात स्थान मिळेल, असे मला वाटत नाही. शेवटी हा पक्षाचा निर्णय असतो. पण, अशा प्रवृत्ती पक्षात येतील, याबाबत मी साशंक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com