Rajan Patil On BJP Entry : 'बबनदादा माझे दाजी; त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय' : राजन पाटलांनी भाजप प्रवेशाची बंदूक ठेवली शिंदेंच्या खांद्यावर

सावंतांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा राजन पाटील यांना फोन आल्याची चर्चा रंगली हेाती. त्याबाबत पाटील म्हणाले...
Rajan Patil-Babanrao shinde
Rajan Patil-Babanrao shindeSarkarnama

सोलापूर : माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Baban shinde) हे आमचे मेहुणे आहेत. माझी बहिण त्यांना दिली आहे. त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय, असे सांगून माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी ‘भाजप (BJP) प्रवेशाला नेमका कुणामुळे उशिर होतोय,’ असा प्रश्न विचारताच ‘बबनदादा माझे दाजी आहेत, त्यांनाच विचारा,’ असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशासंदर्भातील निर्णयाची बंदूक राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बबनदादा शिंदे यांच्या खांद्यावर ठेवली. त्यामुळे शिंदे काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Rajan Patil made another statement regarding BJP entry)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांची उपळाई खुर्द (ता. माढा, जि. सोलापूर) येथे ग्रंथतुला करण्यात आली. त्यानंतर आमदार शिंदे म्हणाले की, कामाच्या ऋणातून उतराई व्हावी, अशी उपळाई येथील ग्रामस्थांची इच्छा होती. त्यानुसार येथील ग्रामस्थांनी माझी ग्रंथतुला केली. राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलताना जनता जो निर्णय घेईल, त्याबरोबर राहू, असे विधान केले होते.

Rajan Patil-Babanrao shinde
Solapur News : मोहोळच्या राजकारणाला कलाटणी : उमेश पाटलांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन घेतली रमेश कदमांची भेट

त्यासंदर्भात आमदार शिंदे यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनीही ‘त्याबाबतीत योग्य वेळी, योग्य निर्णय करू,’ असे संदिग्ध उत्तर दिले. त्यामुळे या दोघांच्या भाजप प्रवेशाबाबत गोंधळ आणखी वाढला आहे. दरम्यान, रस्त्याच्या आणि २५/१५ च्या कामांना दिलेली स्थगिती सरकारने उठवावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

Rajan Patil-Babanrao shinde
Gulabrao Patil : होय मी गद्दारी केली; पण... : गुलाबराव पाटलांची जाहीर सभेत कबुली

राजन पाटील यांना सुप्रिया सुळेंचा फोन?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर ‘राष्ट्रवादाच्या कार्यात राजन पाटील यांनी सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करावे,’ अशी अप्रत्यक्षपणे भाजप प्रवेशाची ऑफर सावंतांनी दिली हेाती. सावंतांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा राजन पाटील यांना फोन आल्याची चर्चा रंगली हेाती. त्याबाबत पाटील म्हणाले की, मला सुप्रिया सुळे यांचा फोन आलेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com