राजळे समर्थक म्हणाले, कसलीही चौकशी लावा आम्ही तयार...

भाजपच्या ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakane ) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
राजळे समर्थक म्हणाले, कसलीही चौकशी लावा आम्ही तयार...
Monica Rajale Vs Pratap DhakneSarkarnama

पाथर्डी (जि. अहमदनगर ) : पाथर्डी नगरपालिका, अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जवळ आल्याने पाथर्डी तालुक्यातील राजकारण तापले आहे. भाजपच्या ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale )राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakane ) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. Rajale supporters said, we are ready to make any inquiry ...

प्रताप ढाकणे यांनी मोनिका राजळे यांच्यावर पाथर्डी नगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांना उत्तरे देण्यासाठी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे म्हणाले की, जॉगिंग पार्क व नाट्यगृहाला (स्व.) माधवराव निऱ्हाळी व मुंडे यांचे नाव दिल्याने तुम्हाला पोटशूळ झाला आहे. निवडणूक आल्यावर तुम्ही जागे होत जी चौकशी तुम्ही लावली, तिला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान गर्जे यांनी दिले.

Monica Rajale Vs Pratap Dhakne
मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

डॉ. गर्जे पुढे म्हणाले, की पाच वर्षे भ्रष्टाचार होताना तुमचे नगरसेवक का बोलले नाही? तुमचे नगरसेवक बंडू बोरुडे एखाद्या भूखंडावर उभे राहिले तर जागामालक दुसऱ्या दिवशी जागेला कुंपण लावतो. ज्यांच्या ताब्यात गावची ग्रामपंचायत नाही, ते पालिकेत ढवळाढवळ करीत आहेत. 120 कोटींची कामे झाली, हे तुम्ही मान्य केल्याबद्दल आभार.

गोकुळ दौंड म्हणाले, की एक संस्था तुमच्या ताब्यात दिली, तर तुम्ही एकही भूखंड शिल्लक ठेवला नाही. तुमच्या जिल्हा परिषद गटात एक माणूस पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही. ज्यांना सोबत घेऊन फिरता, त्यांनी एकाच रस्त्याचे चार वेळा भूमिपूजन केले; पण रस्ता केला नाही. विष्णुपंत अकोलकर म्हणाले, की समितीतील जागा 45 लाख रुपये देऊन एक जण मागत आहे. मात्र, ज्याने तीन लाख दिले, त्याला तुम्ही जागा दिली. तुमच्या ताब्यातील सोसायटीत लाभांशसुद्धा वाटला नाही.

Monica Rajale Vs Pratap Dhakne
मोनिका राजळे म्हणाल्या, विरोधकांच्या टिकेची पर्वा नाही...

काशीबाई गोल्हार म्हणाल्या, की खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा केली. पायाखालची वाळू सरकल्याने महिला आमदारावर आरोप करीत आहेत. माणिक खेडकर म्हणाले, की भालगाव गटात काय केले ते जनतेला माहिती आहे. भ्रष्टाचार झाला, असे म्हणण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी योजना मंजूर केली, त्याचे श्रेय घेण्याचा उद्योग करू नका.

या वेळी नंदकुमार शेळके, अजय भंडारी, काका शिंदे, शिवाजी मोहिते, बाळासाहेब गोल्हार, सचिन वायकर, बंडू बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, प्रतीक खेडकर व नगरसेवक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.