राहुल जगतापांनी केली 'कुकडी'ची निवडणूक बिनविरोध

कुकडी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी आमदार राहुल जगताप यांचे वर्चस्व आहे.
Rahul Jagtap

Rahul Jagtap

Sarkarnama

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील दोन साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यात कुकडी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी आमदार राहुल जगताप यांचे वर्चस्व आहे. वर्चस्व त्यांनी काल ( सोमवारी ) पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. Rahul Jagtap's election of 'Kukdi' without any opposition

दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांनी आयुष्यभर संघर्ष करुन उभारलेल्या कुकडी कारखान्याची निवडणूक त्यांच्या पश्चात बिनविरोध करण्याचा करिष्मा माजी आमदार राहुल जगताप यांनी करून दाखवला. त्यामुळे आज त्यांची राजकीय परिपक्वता सिध्द झाली. विरोधी नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने आज कुकडी सहकारी साखर कारखान्याचे सर्व 21 जागा बिनविरोध करण्यात यश आले.

Rahul Jagtap

"कुकडी' बिनविरोधच्या हालचाली, राहुल जगताप निर्धास्त

कुकडी कारखाना निवडणुकीत दाखल अर्जांची माघार घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. 21 जागांसाठी 148 अर्ज दाखल झाले होते. सेवा संस्था मतदारसंघातून डॉ. प्रणोती जगताप या पूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 20 जागांसाठी किती उमेदवार राहतात, याकडे लक्ष होते. त्यातच विरोधकांचे अनेक उमेदवारी अर्ज अवैध झाल्याने निम्म्या जागांवर विरोधकांना उमेदवार नसल्याचे चित्र होते.

दरम्यान, कुकडीतील प्रमुख विरोधक असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर यांनी ते लढणार अशी घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या गटाचे अनेक अर्ज अवैध झाल्याने त्यांची अडचण झाली. अखेर त्यांनी सहकार व कारखान्याला मदत व्हावी म्हणून निवडणूकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही अर्ज काढून घेतले. या सगळ्या प्रक्रियेत राहुल जगताप यांनी अतिशय शांतपणे यंत्रणा हाताळली. जवळच्या लोकांची समजूत काढताना विरोधी कार्यकर्त्यांशी प्रामाणिक चर्चा केल्याने त्यांना ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले.

Rahul Jagtap

विधानसभेसाठी मला शब्द, सध्या मात्र "कोविड'च लक्ष्य : राहुल जगताप

बिनविरोध विजयी उमेदवार

राहुल जगताप, प्रणोती जगताप, निवृत्ती वाखारे, विजय शिर्के, सुभाष राक्षे, विवेक पवार, संभाजी देवीकर, अशोक वाखारे, मोहन आढाव, मनोहर शिंदे, कचरुजी मोरे, प्रमोद इथापे, मच्छिंद्र नलगे, जालिंदर निंभोरे, अशोक शितोळे, बाळासाहेब उगले, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, मोहन कुदांडे, संपत कोळपे.

Rahul Jagtap

राहुल जगताप यांच्या "कुकडी'च्या बिनविरोधला `खो`, देणी थकल्याचा आरोप

आज तात्या हवे होते... निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, दिनकर पंधरकर, दत्तात्रय पानसरे, लक्ष्मण नलगे यांनी प्रयत्न केले. ज्यांनी कुकडी कारखाना उभारणीसाठी आयुष्य खर्ची केले, त्या तात्यांची आठवण प्रकर्षाने होत असून आज हा विजय पाहण्यासाठी ते हवे होते. तात्यांना हा विजय अर्पण करतो.

- राहुल जगताप, अध्यक्ष कुकडी कारखाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com