राहुल द्विवेदींच्या पथकाने जीएसटीची 218 कोटीची बनावट बिले काढली शोधून : तिघांना अटक

आयएएस अधिकारी राहुल द्विवेदी हे सध्या राज्य कर सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
राहुल द्विवेदींच्या पथकाने जीएसटीची 218 कोटीची बनावट बिले काढली शोधून : तिघांना अटक
GSTSarkarnama

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यात धडकेबाज कारवाया करणारे आयएएस अधिकारी राहुल द्विवेदी हे सध्या राज्य कर सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. राहुल द्विवेदी यांच्या जीएसटी पथकाने 218 कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस बिले शोधून काढली. तसेच या बिलांसंदर्भात तिघांना अटक केली. ( Rahul Dwivedi's team finds fake GST bills of Rs 218 crore: Three arrested )

महाराष्ट्र जीएसटीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले. त्यानंतर 25 एप्रिलला महाराष्ट्र राज्य GST च्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या एम्पायर एंटरप्राइजेस, शंकर एंटरप्रायझेस आणि एम. एम. इंटरप्रायजेस या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी-भेटी करण्यात आल्या. या सर्व करदात्यांनी वीज बिले यासारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच, त्यांना अंधारात ठेवून भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे तपासणी भेटीच्या वेळी आढळून आले.

GST
जिल्हाधिकारी द्विवेदी, पोलिस अधीक्षक शर्मा यांचे निर्णय नगरकरांना भावले; मात्र राजकीय मंडळींना जिव्हारी लागले

या करदात्यांनी 218.26  कोटी रुपये किंमतीच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थ्यांना 39.28 कोटीचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले. याप्रकरणी 29 एप्रिल 2022 रोजी महानगर दंडाधिकारी यांनी शंकर एंटरप्रायझेसचे मालक शंकर आप्पा जाधव (वय 37), एम्पायर एंटरप्रायझेसचे मालक बापू वसंत वाघमारे (वय 36), आणि दस्तऐवज संकलन एजंट आदेश मधुकर गायकवाड (वय 36) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

GST
जीएसटी चोरी रोखण्यासाठी अजित पवारांनी जीएसटी परिषदेला केल्या सात शिफारशी

या तपासाची कारवाई राज्य कर सहआयुक्त राहुल द्विवेदी, उपअभियंता संजय व्ही. सावंत, गिरीश पाटील, राहुल मोहोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे इतर सहायक आयुक्त व राज्य कर निरीक्षक यांनी केली. या आर्थिक वर्षात राज्य जीएसटी विभागाने आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. याव्दारे थकबाकीदार आणि करचोरी करणाऱ्यांना, दोषींना पकडण्यात कोणतीही उणीव ठेवणार नसल्याचा कडक इशारा विभागाने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.