Raghunath Patil : मोदी, फडणवीस शेतकरी विरोधी आहेत

नेवासे तहसील कार्यालयात ज्ञानेश्वर, मुळा व गंगामाई साखर कारखान्याच्या मनमानी विरोधात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.
Sadashiv Lokhande, Raghunath Patil & Balasaheb Murkute
Sadashiv Lokhande, Raghunath Patil & Balasaheb MurkuteSarkarnama

विनायक दरंदले

Shetakari Sanghatna : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना साखर कारखानदारीचा ११-४ चा नियम रद्द करण्याची केलेली मागणी त्यांनी पुर्ण केली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्राला दिलेल्या एका पत्रावर एका मिनिटात सही करुन इथेनॉलला ११-४ चा निर्णय लादल्याने शेतकरी विरोधी निर्णयात एकमेकांचे कट्टर विरोधक मोदी-ठाकरे एक कसे झाले, असा प्रश्न शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला.

नेवासे तहसील कार्यालयात ज्ञानेश्वर, मुळा व गंगामाई साखर कारखान्याच्या मनमानी विरोधात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. विशेष म्हणजे या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोंखडे व 'भाजप'चे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व पदाधिकारी उपस्थित असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. बैठकीत ज्ञानेश्वर कारखान्याने अनाधिकृत कपात केलेल्या प्रतीटन १०९ रुपायाच्या मुद्द्यावर त्यांनी सडेतोड भुमिका बोलून दाखविली.

Sadashiv Lokhande, Raghunath Patil & Balasaheb Murkute
रघुनाथ पाटील म्हणाले, आता संघर्षाची वेळ आली आहे...

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाचव्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी विरोधातील नियम हटवू असे आम्हाला सांगूनही शब्द पाळला नाही.सर्व साखर कारखान्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मध्यस्थी घेवून फडणवीस यांच्या पक्षाला मोठा निधी दिला आणि पुढे ११-४ चा नियम काढण्याचा राहुन गेला. अशा पध्दतीने सोईचे नियम करत गेले तर देश बुडायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.मागील वर्षी गुजरात राज्यात ऊसाला चार हजार सातशे रुपये तर उत्तर प्रदेशात साडेतीन हजारापेक्षा जास्त भाव दिला असताना महाराष्ट्रात २९०० रुपये एफआरपी होती.टनामागे 'आरएसएफ'चा फरक सहाशे रुपये कसा राहतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उसाच्या भावासाठी लढाई बंद करुन शेतकऱ्यांच्या बाजूने एकही कायदा राहिला नाही या विरुद्ध लढा आवश्यक झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Sadashiv Lokhande, Raghunath Patil & Balasaheb Murkute
सरकारी कर्मचाऱ्यांना महिना पाचशे रूपयेच पगार द्या : रघुनाथ पाटील 

मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार मुरकुटे यांना धक्काबुक्की करुन दादागिरी करण्यात आली. ही बाब सहकाराला शोभते का असा प्रश्न भाजपाचे कार्यकर्ते व शेतक-यांनी बैठकीत व्यक्त केला. शेतकऱ्यांचा वाली म्हणून कारखानदार बोलत असले तरी अतिवृष्टीनंतर मदत देण्याच्या मागणीसाठी आम्ही दिवाळी सणाच्या दिवशी चटणी-भाकर खाण्याचे आंदोलन करुनही तालुक्यातील साखर कारखाने मूग गिळून गप्प बसले असा आरोप 'मनसे'च्या मिरा गुंजाळ यांनी केला. या शिवाय बैठकीत कारखान्याच्या ऊस वजनकाट्यात घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला.तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी येथे व्यक्त करण्यात आलेल्या आरोपाची विचारणा करुन कारखान्याकडून खुलासा घेतला जाईल तसेच एफआरपीचा भाव लवकर जाहीर करण्याची सुचना करण्यात येईल असे सांगितले. ज्ञानेश्वर, मुळा व गंगामाई कारखान्याच्या अधिका-यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com