Radhakrishna Vikhe Patil : नेवाशातील खोट्या गुन्ह्याची चौकशी करणार

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नेवासे तालुका दौरा केला.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

Radhakrishna Vikhe Patil : मागील दोन वर्षात राजकीय सुडबुध्दीने पोलिसांना हाताशी धरुन दाखल केलेल्या सर्व गुन्ह्याची चौकशी केली जाईल. वाळूचोरी व रेशन रॅकेट मध्ये असणा-यामध्ये सर्वांवर गुन्हे दाखल करताना यामधील दोषी अधिकाऱ्यांची सुध्दा गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची

लोहगाव(ता.नेवासे) येथील पशुपालक रोहीदास ढेरे यांच्या गोठ्यास भेट दिल्यानंतर विखे-पाटील माध्यमाशी बोलताना वरील प्रमाणे इशारा दिला.यापुढे पुन्हा खोटे गुन्हे दाखल होवू नये याकरीता पोलीस उपअधीक्षकांना अधिकार देण्याची सुचना दिली.कोवीड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्वत्र मोफत धान्य वाटप झाले मात्र नेवासे तालुक्यात या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला असल्याने यापुढे दिव्याखालचा अंधार खपवून घेतला जाणार नाही, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

भानसहिवरे येथील रेशन काळाबाजार प्रकरणी दोन आरोपीस अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे. यामध्ये संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करुन तलाठी व मंडलाधिकारी निलंबितच्या सुचना दिल्या. तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.वाळू आणि रेशन काळाबाजार प्रकरणी कुणाचीच गय केली जाणार नाही, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com