Radhakrishna Vikhe Patil : ठाकरेंचे प्रेम बेगडी...

महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक टोला लगावला.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

Radhakrishna Vikhe Patil : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पाहाणी दौरा म्हणजे केवळ फार्स असून,अडीच वर्ष घरात बसले तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघाले असल्याचा खोचक टोला महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी लगावला.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या दुसऱ्या दिवसाच्या पाहाणी दौऱ्याची सुरवात तालुक्यातील अस्तगाव येथून केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार कुंदन हिरे सहभागी झाले होते.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : नेवाशातील खोट्या गुन्ह्याची चौकशी करणार

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यावर सडकून टिका केली. विखे पुढे म्हणाले, की अडीच वर्ष घरात बसून माझे कुटुंब तुमची जबाबदारी म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. तेच आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे. कोविड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही. ते आता शेतकऱ्यांना काय देणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उत्पादनाला दुप्पट हमी भाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परीणाम पाहायला मिळत असल्याने आपले तारणहार फक्त पंतप्रधान मोदी आहेत ही भावना देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याने यांना राज्यातील शेतकऱ्यांनी पुरते ओळखले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

नैसर्गिक स्त्रोत पुर्ववत करा

अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यातील पाणी गावामध्ये शिरले. याला फक्त झालेली अतिक्रमण कारणीभूत आहे. अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या पुराचा परीणाम पायाभूत सुविधा उध्वस्त होण्यावर झाल्याने पुन्हा जुने नकाशे काढून ओढ्या नाल्याचे नैसर्गिक स्त्रोत पुर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले असून सर्वच लोकप्रतिनिधीनी ही भूमिका घेतली तर या संकटापासून वाचता येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com