राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निळवंडेच्या गप्पा मारणारे 30 वर्षांपूर्वी कुठे होते...

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
Radhakrishna Vikhe Patil & Dr. Sujay Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil & Dr. Sujay Vikhe Patil Paresh kapse

अहमदनगर - शिर्डी मतदार संघातील केलवड, खडडेवाके, पिपरी लोकाई नांदुर्खी, दहेगाव, वाळकी डोऱ्हाळे, कोऱ्हाळे आडगाव येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थीना विविध साहित्य वितरण कार्यक्रम राहाता येथे आज झाला. या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, where were the people chatting about Nilwande 30 years ago ... )

या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उत्तर प्रदेश येथील डॉ.एन सिंग, डॉ. आर के श्रीवास्तव, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गमे, पी. डी. गमे, काळू रजपूत, गणीभाई शेख, सचिन मुरादे, सतीश बावके, बाळसाहेब डांगे, उत्तमराव डांगे, संतोष ब्राम्हणे, सुनील गमे, नामदेव घोरपडे, नकुल वाघे, पुनम बर्डे, संगिता कांदळकर आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil & Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात जनतेला आधार देत असतांना मोफत धान्य, मोफत कोविड लस उपलब्ध करुन दिली. राज्यातील महाआघाडी सरकारने उलट बिलाअभावी शेतकऱ्यांचे वीज जोडणी तोडली, याविषयी आपण प्रश्न उपस्थित केल्यानंर वीज तोडली जाणार नाही, असा निर्णय सरकारला घ्यावा लागला. आघाडी सरकार फक्त घोषणा करते. इथेही अनेकजण निळवंडेच्या गप्पा मारतात मग 30 वर्षांपूर्वी कोठे होते? असा टोला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, गोरगरीब जनता हाच आपल्या विकासाचा केंद्रबिंद असून केलवडसाठी 12 कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरु होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil & Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, देशद्रोही मंत्र्यांची पाठराखण करण्‍यासाठी मंत्रीच रस्‍त्‍यावर...

शिर्डी मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम सुरु आहे. राज्यातील महाआघाडी सरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले. वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले पण आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करून वीज तोडणी थांबविली आहे. कोविड काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले योगदान काय? दुधाचा प्रश्न आणि दूध दरवाढीचे आश्वासन दिले. पुर्तता मात्र अजूनही नाही. निवडकीपुरते जनतेसमोर येणारे देखील जनतेत नाही. केंद्र सरकारवर टीका करतांना आपण काय केले हे जनतेला सांगा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हातील 41 हजार लोकांना यांचा लाभ दिला, मात्र येथील खासदार मात्र कुठे दिसत नाहीत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil & Dr. Sujay Vikhe Patil
Video: "वाईन विकली तर ते किराणा दुकान मी बंद करेल",डॉ. सुजय विखे पाटील

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनाचा आढावा घेत असतांनाच सर्वांना बरोबर घेत समाजिक दायित्वाचा वारसा आपण जपत आहोतं. पण विखे पाटील यांचे नाव घेतल्या शिवाय काहीना चैन पडत नाही मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो आपण सर्वांना पुरुन उरतो. त्यामुळे आपण आपली चिंता करा आमची चिंता करू नका असा सल्ला देत असतानाच या योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुकर केले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी केलवड येथील 1 कोटी 13 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com