राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत...

एसटी कामगारांनी आज (शनिवारी) लोणी येथे माजी परिवहन मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

शिर्डी ( जि. अहमदनगर ) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ देऊनही आंदोलन सुरू आहे. कोपरगाव, श्रीरामपूर व संगमनेर आगारांतील कामगारांनी आज (शनिवारी) लोणी येथे माजी परिवहन मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ( Radhakrishna Vikhe Patil said, we are with you in this battle ... )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखवटा आंदोलनास आपला पाठिंबा आहे. काही कामगारांनी आपली जीवनयात्रा संपविली, तरी महाविकास आघाडी सरकारला सहानुभूती वाटत नाही. नोकऱ्या गेल्याने वेतन बंद झालेल्या संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर आगारांतील कामगारांना त्यांच्या मागणीनुसार किराणा साहित्य आपण देऊ, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आता कुलगुरू होण्यासाठी मंत्रालयात लॉबिंग होणार

ते पुढे म्हणाले, की कंत्राटी कामगारांच्या नियुक्त्या करून महामंडळाच्या बस सुरू झाल्या असल्या, तरी अद्यापही सर्वच ठिकाणी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारने संप मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, तरी कामगारांनी दाखविलेली एकजूट महत्त्वाची आहे. या आंदोलनास पहिल्यापासून पाठिंबा दिला. न्यायालयीन लढाईसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले. या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे यावेळी आमदार विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in