राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही...

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil Latest News
Radhakrishna Vikhe Patil Latest NewsSarkarnama

अहमदनगर - राज्यातील भाजप व महाविकास आघाडीतील आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध थांबताना दिसत नाही. यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, there is no rule of law left in Maharashtra ... )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट यावी अशा प्रकारचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (Radhakrishna Vikhe Patil Latest News)

Radhakrishna Vikhe Patil Latest News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडे बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी नाही

त्यांनी पुढे सांगितले, की मला आश्चर्य वाटले की राज्य सरकारला भीती का वाटते. त्यांचा कारभार स्वच्छ, पारदर्शी, लोकाभिमुख आहे तर लोकशाहीमध्ये ज्या ठिकाणी स्वतःचे मत व्यक्त करण्याचे असलेले स्वातंत्र्य का दिले जात नाही. राज ठाकरे असो अथवा कोणीही जाहीर सभा घेत असतील तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र फक्त त्याचे भांडवल करून सभेला परवानग्या नाकारायच्या सरकारचे अपयश जनते समोर येऊ द्यायचे नाही, हे लोकशाहीला घातक आहे, असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com